चार नगर परिषदेत सभापतींची निवड
By admin | Published: January 8, 2017 12:49 AM2017-01-08T00:49:17+5:302017-01-08T00:49:17+5:30
जिल्ह्यातील वरोरा, बल्लारपूर, मूल, राजूरा या नगरपरिषदांमधील निवड शनिवारी झाली. त्यामध्ये विविध पक्षांच्या नगरसेवकांना संधी मिळाली आहे.
भाजपचे वर्चस्व : राजुरा, बल्लारपूर, मूल व वरोरा येथे निवडणूक
चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा, बल्लारपूर, मूल, राजूरा या नगरपरिषदांमधील निवड शनिवारी झाली. त्यामध्ये विविध पक्षांच्या नगरसेवकांना संधी मिळाली आहे.
वरोरा : नगरपरिषदेच्या विविध विषय समिची घोषणा शनिवारी करण्यात आली असून स्थायी समितीच्या पदसिध्द सभापतिपदी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली यांची व शिक्षण समितीचे पदसिध्द सभापती म्हणून उपनगराध्यक्ष अनिल झोटिंग यांची निवड करण्यात आली .
बांधकाम समिती सभापती भाजपाचे अक्षय भिवदरे, नियोजन व विकास समिती सभापती - अनिल साखरिया, आरोग्य व स्वच्छता समिती सभापती म्हणुन अपक्ष नगरसेवक शेख जैरुद्दीन छोटूभाई, पाणी पुरवठा समिती सभापती भाजपाच्या दीपाली टिपले, महिला व बालकल्याण समिती सभापती भाजपच्या ममता परसराम मरस्कोल्हे यांची निवड करण्यात आली. तर उपसभापती सरळ शामसुंदर तेला यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
तसेच स्थायी समिती सदस्य अक्षय भिवदरे, शेख जैरुद्दीन छोटूभाई , दीपाली टिपले, ममता मरस्कोल्हे, अनिल साकरिया, प्रदीप बुराण, दिलीप घोरपडे, गजानन मेश्राम आदींची निवड करण्यात आली. यावेळी पीठासिन आधिकारी म्हणून उपविभागीय आधिकारी प्रमोद भुसारी यांनी काम पाहिले. यावेळी मुख्य आधिकारीगिरीश बन्नोरे सर्व नगरसेवक तथा नगरपरिषद अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी )
सर्वात कमी
वयाचे सभापती
अवघ्या २३ वर्षांत नगर परिषद निवडणूक लढून त्यात भरघोस मताने निवडून येत अक्षय भिवदरे त्यांनी वरोरा नगर परिषदेत सर्वात कमी वयात निवडून येण्याचा बहुमान मिळवला होता शनिवारला त्यांची सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती पदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
मूल नगर परिषदेत सभापतींची निवड
मूल : नगर परिषदेत शनिवारी विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली. त्यामध्ये उपाध्यक्षपदी नंदकिशोर रणदिवे, बांधकाम व नियोजन सभापतिपदी प्रशांत समर्थ, पाणीपुरवठा सभापती मिलिंद खोब्रागडे, शिक्षण व क्रीडा सभापती प्रशांत लाडवे, महिला व बालकल्याण सभापती शांता मांदाडे, महिला व बालकल्याण उपसभापतिपदी संगिता वाळके यांची निवड करण्यात आली.
राजुरा नगर परिषद
राजुरा : नगर परिषदेच्या सभागृहात नवनिर्वाचित नगरसेवकांमधून पाच विभागासाठी पाच स्वतंत्र सभापतींची निवड प्रक्रिया अतिशय शांततेच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात शनिवारी पार पडली. त्यामध्ये बांधकाम सभापती आनंद दासरी, शिक्षण सभापती वज्रमाला बत्कमवार, महिला व बालकल्याण सभापती दीपा करमरकर, स्वच्छता व आरोग्य सभापती साधना भाके, नियोजन व पाणीपुरवठा सभापती पदसिद्ध उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पीठासीन अधिकारी बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी शाहुराज मोर यांनी काम पाहिले. नगर परिषद राजुराचे प्रभारी मुख्याधिकारी अमन मित्तल, नगराध्यक्ष अरूण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, नगरसेवक हरजित सिंह संधू, गजानन भटारकर, शारदा देविदास टिपले, गीता रोहने, संध्या चांदेकर यांच्यासह राजेंद्र डोहे, रमेश नळे आदी उपस्थित होते.
बल्लारपूर नगर परिषद
बल्लारपूर : नगर परिषद कार्यालयात विषय समित्यांच्या सभापतींची निवड शनिवारी करण्यात आली. त्यामध्ये शिक्षण सभापती जयश्री मोहुर्ले, स्वछता व सार्वजनिक आरोग्य सभापती महेंद्र ढोके, पाणीपुरवठा सभापती भावना गेडाम, नियोजन आणि विकास सभापती राकेश यादव, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा भटारकर, महिला व बालकल्याण उपसभापती पूनम निरंजने यांची निवड करण्यात आली आहे. सभेच्या पिठासीन अधिकारी गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे व नगर पषिदेचे मुख्याधिकारी विपिन मुद्धा यांनी कामकाज पाहिले.