पक्त चार हजार ८०० डोस शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:30 AM2021-04-09T04:30:30+5:302021-04-09T04:30:30+5:30
आरोग्यसेवक, कोरोना योद्धा, ४५ वर्षांवरील सर्व व ६० वर्षांवरील नागरिकांचे वेगाने लसीकरण सुरू झाले. लस घेण्यात अडचणी येऊ नये, ...
आरोग्यसेवक, कोरोना योद्धा, ४५ वर्षांवरील सर्व व ६० वर्षांवरील नागरिकांचे वेगाने लसीकरण सुरू झाले. लस घेण्यात अडचणी येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने ९१ केंद्र तयार केले. चंद्रपूर महानगर पालिका आरोग्य विभागाने १४ केंद्रांवरून लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली. मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे एक लाख १७ हजार डोसची मागणी केली. मात्र, जिल्ह्यातील सर्व केंद्रांसाठी कोविशिल्डचे केवळ ३५ हजार ४० हजार डोस मिळाले. त्यामुळे डोस वितरण करताना प्रशासनाची दमछाक झाली. लस घेण्यासाठी आता नागरिकांकडून प्रतिसाद मिळू लागल्याने गुरूवारी जिल्ह्यात केवळ चार हजार ८०० डोस शिल्लक राहिले. मुंबईतून नागपूर आरोग्य संचालक कार्यालयात शुक्रवारी डोस उपलब्ध झाले नाही तर जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवाव्या लागणार असल्याची स्थिती आहे.
नऊ केंद्रांवरून नागरिक परतले
बल्लारपूर : तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिक प्रतिबंधक लस लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, गुरूवारी तालुक्यातील नऊ केंद्रांवरून नागरिकांना परत जावे लागले. केवळ बामणी येथील आरोग्य केंद्रात ४० जणांना लस देण्यात आली.
शहरातील ग्रामीण रूग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, रेल्वे इन्स्टिट्युट, नाट्यगृह, बल्लारपूर मेडिकल असोसिएशन, वेकोलि रूग्णालयात लसीकरण केंद्र सुरू झाले. गुरूवारी सकाळी नागरिक केंद्रात गेले असता लस उपलब्ध नसल्याचा पलक दिसला. बामणी कोठारी, विसापूर येथेही लसीकरण झाले नाही.
भद्रावती, ब्रह्मपुरी, राजुरातही तुटवडा
भद्रावती, ब्रह्मपुरी, राजुरा तालुक्यात काहींनी को-विन अॅपवर तर बºयाच जणांनी ऑफलाईन नोंदणी केली. मात्र, पुरेसे डोस उपलब्ध नसल्याने परत जावे लागल्याची माहिती आहे.