चाराचे फळ झाले त्यांच्या रोजगाराचे साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:30 AM2021-04-09T04:30:43+5:302021-04-09T04:30:43+5:30

घनश्याम नवघडे नागभीड : रानमेव्यात गणना होणारे चाराचे फळ सध्या नवखळ येथे अनेकांच्या रोजगाराचे साधन बनले आहे. नागभीडलगतच्या नवखळा ...

The fruit of fodder became their means of livelihood | चाराचे फळ झाले त्यांच्या रोजगाराचे साधन

चाराचे फळ झाले त्यांच्या रोजगाराचे साधन

googlenewsNext

घनश्याम नवघडे

नागभीड : रानमेव्यात गणना होणारे चाराचे फळ सध्या नवखळ येथे अनेकांच्या रोजगाराचे साधन बनले आहे.

नागभीडलगतच्या नवखळा येथील २५ ते ३० महिला आपला उदरनिर्वाह या फळ विक्रीतून करीत आहेत.

उन्हाळ्यात चाराच्या फळाला अनेकांची पसंती असते. म्हणूनच विक्रीसाठी येणारे चाराचे फळ नागरिक मोठ्या आवडीने विकत घेत असतात. नागभीड तालुक्यात जंगल मोठ्या प्रमाणावर आहे. या जंगलात इतर झाडांप्रमाणेच चाराच्या झाडांनाही पोषक वातावरण आहे. साधारणत: १५ फुटांपासून २५ फुटांपर्यंत या झाडांची वाढ होत असून उन्हाळ्याच्या मार्च महिन्यात या झाडांना फळधारणा होत असली तरी एप्रिलमध्ये ही फळे परिपक्व होत असतात.

नागभीड नगर परिषदेत समावेश असलेल्या नवखळा या गावालगत जंगल आहे. त्यामुळे येथील काही नागरिक ऋतुमानानुसार जंगलातील साधनसंपत्तीचा आपल्या रोजगारासाठी उपयोग करीत असतात. सध्या या नागरिकांनी चाराच्या या फळांनाच आपले रोजीरोटीचे साधन केले आहे. अगदी पहाटेच हे नागरिक जंगलाच्या दिशेने निघतात. उन्ह होईपर्यंत म्हणजेच, दुपारी १२ वाजेपर्यंत ते या फळांची तोडणी करतात. त्यानंतर दुपारनंतर नागभीड शहरात ही फळे विक्रीसाठी आणत असतात. नवखळा येथील किमान २५ ते ३० महिला सदर फळ विक्रीचे काम करतात.

बॉक्स

यावर्षी टेंभरंही मुबलक

नवखळा परिसरातील जंगल घोडाझरी अभयारण्यात समाविष्ट झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून तेंदूपत्ता संकलनावर बंदी आहे. परिणामी तेंदूची झाडे मोठ्या प्रमाणावर वाढून आली आली आहेत. एवढेच नाही तर फळधारणाही मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे नवखळा येथील काही जणांनी तेंदूच्या फळांची मोठ्या प्रमाणात विक्री करून आर्थिक कमाई केली, अशी माहिती नवखळा येथील नंदेश्वर सातपैसे या तरुणाने दिली.

बॉक्स

अशी असते चारोळी

चाराचे हे झाड काजू कुळातील असून अतिशय काटक आहे. हे झाड १५ ते २५ फूट उंच वाढते. पाने काजूच्या पानासारखी असून झाडाची साल काळी, करडी व चौकोनी आकाराच्या खवल्यांनी विभागलेली असते. चारोळीची फळे करवंदासारखी गोल असतात. फळे कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर काळी होतात. फळांचा गर गोड असून आत कठीण कवच असते. कवचाच्या आत गोडंबी असते. या बियांनाच चारोळी म्हणतात. बिया गोल, चपट्या, नरम व चवीला काजूप्रमाणे लागतात.

Web Title: The fruit of fodder became their means of livelihood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.