उपजिल्हा रुग्णालयास निधी उपलब्ध करून द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:28 AM2021-02-10T04:28:16+5:302021-02-10T04:28:16+5:30
फोटो नागभीड : नागभीड येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर असून या रुग्णालयास त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अशी ...
फोटो
नागभीड : नागभीड येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर असून या रुग्णालयास त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
सध्या नागभीड येथे ग्रामीण रुग्णालय असून यात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. नागभीड येथून नागपूर व चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ११० कि.मी. अंतरावर असल्याने वेळेवर उपचाराअभावी अत्यवस्थ रुग्ण दगावण्याच्या घटना वाढल्या आहेत. सन २००१ च्या लोकसंख्येवर आधारित अहवालानुसार प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय यांनी नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयास २४ ऑगस्ट २०१८ रोजी उपजिल्हा रुग्णालय म्हणून मान्यताही दिली आहे. अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, चंद्रपूरद्वारा सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी २० ऑगस्ट २०१९ रोजी ४५७७.७९ लक्ष रुपयांच्या बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली. मात्र निधी अद्यापही प्राप्त झाला नाही. निधी प्राप्त होत नसल्यामुळे या उपजिल्हा रुग्णालयाचे काम ठप्प आहे. या कामास गती देण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार भांगडिया यांनी अर्थमंत्री पवार यांच्याकडे केली असून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पवार यांनी भांगडिया यांना दिले आहे.