युवती होणार "मायनिंग अभियंता"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:55 AM2020-12-04T04:55:55+5:302020-12-04T04:55:55+5:30
अखिल भारतीय तंत्र शिक्षक परिषदेच्या अखत्यारीत संस्थांमधील मायनींग पदविका अभ्यासक्रमाला विद्यार्थिनींना आजपर्यत प्रवेश दिला जात नव्हता. मात्र २०२०-२१ शैक्षणिक ...
अखिल भारतीय तंत्र शिक्षक परिषदेच्या अखत्यारीत संस्थांमधील मायनींग पदविका अभ्यासक्रमाला विद्यार्थिनींना आजपर्यत प्रवेश दिला जात नव्हता. मात्र २०२०-२१ शैक्षणिक सत्रापासून मायनींग अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार असल्याने विद्यार्थिनींना आता मायनींग अभियंता होण्याची संधी मिळणार आहे. राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी केलेले आहे. चंद्रपूर जिल्हा कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे. वेकोलिमुळे दरवर्षी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. मात्र मायनिंग पदविकेसाठी विद्यार्थिनींना प्रवेश नसल्याने आमदार प्रतिभा धानोरकर घ्या आग्रही होत्या. त्यांच्या प्रयत्नाने आता युवकांना या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे.