लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : अखेरच्या घटका मोजत असलेले येथील जागतिक स्तरावरील प्रसिद्ध ग्रामोदय संघाला पूर्ववत आणू, अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.
तालुका व शहर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.ग्रामोदय संघात सध्या तयार करण्यात येत असलेल्या वस्तूंना बाजारात पाहिजे तशी मागणी नसल्याने हा संघ डबघाईकडे जात आहे. आजच्या जागतिक बाजारपेठेच्या मागणीनुसार याठिकाणी सिरॅमिकच्या (मातीच्या) वस्तूंचे आधुनिक पद्धतीने उत्पादन सुरू करून पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. या ठिकाणी कुशल व अकुशल अशा पाच हजार कामागारांना काम दिले जाईल. असेही ते यावेळी म्हणाले.अध्यक्षस्थानी मोरेश्वर टेमुर्डे, प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस नेते डॉ.विजय देवतळे, डॉ. आसावरी देवतळे, भगतसिंग मालुसरे, दिलीप ठेंगे, धनंजय गुंडावार, विठ्ठल मांडवकर, नगरसेवक सरीता सूर, प्रेमदास आस्वले, शामसुंदर पोडे, सुभान सौदागर, धर्मेंद्र हवेलिकर, छोटू पारोधे, प्रतिभा धानोकर, वच्छला धानोरकर, चिंतामन आत्राम, सुधाकर आत्राम, मुनाज शेख, रोहणकर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक लक्ष्मण बोढाले, संचालन भगतसिंग मालुसरे यांनी केले.जिल्ह्यातील बंद पडलेले उद्योग सुरु करूआयुध निर्माणी, कोळसा खाणी आणि बंद पडलेले जिल्ह्यातील उद्योगाकडे आपण विशेष लक्ष देणार असून ते सुरु करण्यासाठी पूरेपुर प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी दिले. बंद पडलेली एम्टा कोळसा खाण सहा महिन्याच्या आत सुरू करून बेरोजगारांच्या हाताला काम दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.