कोरोना रूग्णांचा आलेख घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:38 AM2020-12-30T04:38:24+5:302020-12-30T04:38:24+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात ८५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर ३६ बाधितांची ...

The graph of corona patients dropped | कोरोना रूग्णांचा आलेख घसरला

कोरोना रूग्णांचा आलेख घसरला

Next

चंद्रपूर : जिल्ह्यात मागील २४ तासात ८५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर ३६ बाधितांची नव्याने भर पडली. दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे कोरोना रूग्णांचा जिल्ह्यातील आलेख आता घसरू लागला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार २४६ वर पोहोचली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१ हजार ४०६ झाली आहे. सध्या ४७७ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ७१ हजार २८१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ४६ हजार ३५२ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

मृत झालेल्यांमध्ये बापू नगर, दिग्रस येथील ६६ वर्षीय महिला व बल्लारपूर शहरातील ६५ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३६३ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३३४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १७, यवतमाळ आठ, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. कोरोना आजार अद्याप गेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्याप आढळून येत आहेत. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

बॉक्स

तालुकानिहाय आढलेले रूग्ण

आज बाधित आलेल्या ३६ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील १५, चंद्रपूर तालुका सात, बल्लारपूर दोन, भद्रावती एक, नागभीड एक, सिंदेवाही एक, मूल एक, सावली एक, राजूरा एक, चिमुर एक, वरोरा दोन व इतर ठिकाणच्या तीन रुग्णाचा समावेश आहे.

Web Title: The graph of corona patients dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.