बोलल्याप्रमाणे कृती करीत असल्याने पालकमंत्री लोकप्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:52 PM2019-07-30T23:52:37+5:302019-07-30T23:53:24+5:30
मराठीमध्ये ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ अशी म्हण आहे. ही म्हण राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लागू पडते. त्यांनी जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पाळला. बल्लारपूर येथील बसस्थानकाच्या लोकार्पणाप्रसंगी बल्लारपूर व परिसरातील नागरिकांना नवीन बसस्थानकातून नव्या बसेसमधून प्रवास करायला मिळेल, असे अभिवचन दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : मराठीमध्ये ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ अशी म्हण आहे. ही म्हण राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लागू पडते. त्यांनी जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पाळला. बल्लारपूर येथील बसस्थानकाच्या लोकार्पणाप्रसंगी बल्लारपूर व परिसरातील नागरिकांना नवीन बसस्थानकातून नव्या बसेसमधून प्रवास करायला मिळेल, असे अभिवचन दिले होते. ५७ बसेसचे लोकार्पण करताना त्याची पूर्तता होत आहे. म्हणूनच पालकमंत्री लोकप्रिय आहेत, असे प्रतिपादन वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल केले.
बल्लारपूर बसस्थानकात सोमवारी पार पडलेल्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. यावेळी बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आर. जी. कांबळे, श्री सांगवीकर, विभागीय नियंत्रक राजेंद्र्र कुमार पाटील, भागेकार, हेडावू, व्ही. एस. जोग, शिवचंद द्विवेदी, काशीनाथ सिंह, मनीष पांडे, समीर केने, येलच्या दासरफ, राजु गुलेटी, राजु दाटी, वैशाली जोशी, आशा संगीडवार, सुर्वणा भटारकर, सारिका कनकम, जयश्री मोहरले, राकेश यादव, रेणुका दुधे, स्वामी रायभरम, पुनम निरांजने, कांता दोहे, सतीश कणकम, देवेंद्र वाटकर आदींची उपस्थिती होती.
बल्लारपूर बसस्थानकाचे लोकार्पण करताना ना. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यामध्ये २०० नवीन बसेस उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले होते. राज्यामध्ये नवीन बसेस चंद्र्रपूर व गडचिरोलीच्या प्रवाशांना देखील मिळाल्या पाहिजेत, यावर ना. मुनगंटीवार आग्रही होते. त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करून दाखविला. येत्या काही दिवसांत आणखी दीडशे बसेस जिल्ह्यात धावणार आहेत. नगराध्यक्ष शर्मा यांनी बल्लारपूर, पोंभुर्णा, मूल परिसरात पाच वर्षांतील विकासकामांचा आढावा यावेळी सादर केला.
महाराष्ट्रातील सर्वांगसुंदर विकसित भागात आधुनिक बसेसच्या माध्यमातून सेवा करायला मिळत असल्याबद्दल त्यांनी आभार मानले. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नव्या बसेसचे विधिवत पूजन व प्रवाशांना भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला शहरातील मान्यवर व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.