संकल्प ग्राम विकास विहान प्रकल्पतर्फे आरोग्य कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:24 AM2021-01-15T04:24:05+5:302021-01-15T04:24:05+5:30
चंद्रपूर : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था संचालित लिंक वर्कर प्रकल्प चंद्रपूर व विहान प्रकल्पाच्या वतीने ...
चंद्रपूर : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था संचालित लिंक वर्कर प्रकल्प चंद्रपूर व विहान प्रकल्पाच्या वतीने एचआयव्ही बाधित रुग्णांची आरोग्य कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी अध्यक्षस्थानी एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार तर प्रमुख पाहुणे जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरुळकर, मार्गदर्शक एआरटी समुपदेशक सोनाली चौधरी, देवेंद्र लांजे आदी उपस्थित होते.
एचआयव्ही बाधित बालकांना प्रोटीन पावडरचे वाटप करण्यात आले. नियमित औषधोपचार, शासकीय योजना, स्वतः व कुटुंबाने घ्यावयाची आरोग्यविषयक काळजी, पोषक आहार व उदरनिर्वाहासाठी पूरक स्वयंरोजगाराची माहिती आदी विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत ४० एचआयव्ही बाधित उपस्थित होते. लिंक वर्कर प्रकल्पाचे डीआरपी रोशन आकुलवार यांनी प्रास्ताविक तर संचालन विहान प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापक संगिता देवाळकर यांनी केले.
आयोजनासाठी लिंक वर्कर प्रकल्पाचे पर्यवेक्षक रुपाली मडावी, राकेश आमटे, मयूर घरोटे व विहान प्रकल्पाच्या ममता हिरेखण, पौर्णिमा गोंगले, धनिशा रंगारी आदींनी सहकार्य केले.