खासगी शिकवणी वर्गांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:29 AM2021-09-19T04:29:20+5:302021-09-19T04:29:20+5:30
जुन्या वाहनांची तपासणी करा ब्रह्मपुरी : शहरात कोळसा खाणी, तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा ...
जुन्या वाहनांची तपासणी करा
ब्रह्मपुरी : शहरात कोळसा खाणी, तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, जुन्या वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने प्रदूषण वाढले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषणात वरच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देऊन नागरिकांचे आरोग्य जपावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
बार्टीचे मोफत प्रशिक्षण राबवावे
चंद्रपूर : कोरोनामुळे शिकवणी वर्ग बंद असल्याने मागील वर्षी बार्टीतर्फे मोफत स्पर्धा परीक्षेचे शिकवणी वर्ग घेण्यात आले होते. कोरोनाने अद्यापही शिकवणी वर्ग घेण्यास मुभा नसल्याने यंदाही बार्टीतर्फे मोफत प्रशिक्षण राबविण्याची मागणी होत आहे. दरम्यान, काही विद्यार्थी घरीच राहून अभ्यास करीत आहे. मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.
तारसा येथील नाल्यांचा उपसा करा
वढोली : गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुज येथील वॉर्ड नं. २ सह इतर वाॅर्डामधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुडुंब आहेत. त्यामुळे येथील नाल्यांचा उपसा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तालुक्यातील काही गावांमध्ये नाल्या तुंबल्यामुळे गावामध्ये अस्वच्छतेचे वातावरण आहे.
ग्रामीण भागात ऑटो व्यवसाय संकटात
चंद्रपूर : ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी बेकारीवर मात करण्यासाठी ऑटो व्यवसायाकडे धाव घेतली. मात्र, पुरेसे प्रवासी मिळत नसल्यामुळे ऑटो व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे घरखर्च कसा भागवायचा असा प्रश्न सध्या ऑटो चालकांना पडला आहे.
पाणीपुरवठा सुरळीत करावा
चंद्रपूर : इरई धरणात मोठ्या प्रमाणात जलसाठा असूनही चंद्रपूर शहरातील काही भागात अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील काही प्रभागात नळाद्वारे अत्यंत कमी पाणी सोडले जाते. अर्धा-एक तासातच नळाची धार बारीक होत असल्याने पाणीच मिळत नाही.