एचआयव्हीग्रस्त शासकीय औषधी गोळ्यांपासून वंचित

By Admin | Published: April 30, 2016 12:54 AM2016-04-30T00:54:44+5:302016-04-30T00:54:44+5:30

एचआयव्हीग्रस्तांना मोफत सल्ला व औषधीयुक्त गोळ्यांचे वितरण रुग्णालयातील एआरटी सेंटरमधून करण्यात येत आहे.

HIV deprived of government medicines | एचआयव्हीग्रस्त शासकीय औषधी गोळ्यांपासून वंचित

एचआयव्हीग्रस्त शासकीय औषधी गोळ्यांपासून वंचित

googlenewsNext

अनियमित पुरवठा : आठ दिवसांपासून निर्माण झाली समस्या
वरोरा: एचआयव्हीग्रस्तांना मोफत सल्ला व औषधीयुक्त गोळ्यांचे वितरण रुग्णालयातील एआरटी सेंटरमधून करण्यात येत आहे. परंतु या गोळ्या राज्यातील बहुतांश एआरटी सेंटरमध्ये संपल्या असल्याने मोठी अडचणी निर्माण झाली आहे. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून राज्यातील एचआयव्हीग्रस्त नियमित सेवनासाठी असलेल्या गोळ्यांपासून वंचित झाले आहे.
एचआयव्ही रुग्ण बरा झाला पाहिजे, यासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहे. बहुतांश आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र ग्रामीण रुग्णालय, जिल्हास्तरीय शासकीय रुग्णालयात रक्त तपासणी करुन एचआयव्ही असल्यास अशा रुग्णांना शासकीय एआरटी (अ‍ॅन्टी रिटरो व्हायरल थेरेपी) मधून मोफत सल्ला व औषधीयुक्त गोळ्याचे वाटप केले जाते. प्रत्येक रुग्णास दररोज एक गोळी सेवन करावी लागत असल्याने अशा रुग्णांना महिन्याच्या तीन तर शरिरातील पांढऱ्या पेशींची संख्या ३०० पेक्षा खाली असेल अशा रुग्णांनाही एआरटी सेंटरमधून औषधीयुक्त गोळ्या पुरविल्या जातात. काही रुग्णांना दिवसातून दोन गोळ्या सेवन करण्याकरिता दिल्या जात असतात. यासोबतच गरोदर माता व टीबी रुग्णासही या गोळ्या दिल्या जातात. या गोळ्या राज्यातील बहुतांश एआरटी सेंटरमध्ये संपत आल्या आहेत. काही सेंटरवर गोळ्या आहेत. परंतु त्या कमी असल्याने अनेक रुग्णांना त्या मिळत नाहीत. परिणामी एचआयव्ही रुग्ण गोळ्याविना मागील काही दिवसापासून आपले जीवन कठीत असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)

बाजारात ३० गोळ्यांसाठी तीन ते पाच हजार रुपये मोजावे लागतात. सामान्य रुग्णाला ते परवडण्यासारखे नाही. एआरटी सेंटरमधून मिळणाऱ्या गोळ्यांमुळे अशा रुग्णांना निश्चितपणे दिलासा मिळतो. बाजारमूल्य अधिक असल्याने रुग्ण बाजारातून गोळ्या घेवू शकत नाही. स्थानिक पातळीवर औषधी युक्त गोळ्या घेण्याचे अधिकार नाही. त्यामुळे शासनाकडे मागणी केली असून एक ते दोन दिवसात उपलब्ध होतील.
- सुमन पनगंटीवार
कार्यक्रम अधिकारी, चंद्रपूर

Web Title: HIV deprived of government medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.