आंबेडकर नगर येथील ऋषीदेव उराडे हे लग्नासाठी गावाला गेले होते. कुलूपबंद घर हेरुन चोरट्यांनी घराचा दरवाजा फोडून दागिने पळविले. याबाबतची तक्रार रामगनर पोलीस स्टेशनमध्ये केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरु केला. यावेळी विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याची चोरीची कबूली दिली. यावेळी आरोपीकडून नगदी २० हजार, दीड तोळ्याची चैन, अंगठी, सोन्या चांदीचे दागिने यासह दुचाकी जप्त केली आहे. तसेच भद्रावती येथून पळविलेली मोटारसायकल कुमार सानू यांच्याकडून जप्त केली. कारवाई रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात सपोनि मलिक, बोकरे, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, पुरुषोत्तम चिकाटे, संजय चौधरी, किशोर वैरागडे, विकास जूमनाके, सतीष अवथरे, लालू यादव,संदीप कामडी, भावना रामटेके, हिरालाल आदींनी केली.
बॉक्स
बाल निरीक्षण गृहातून झाला होता फरार
अटकेतील विधीसंघर्षग्रस्त बालक मागील तीन महिन्यांपासून बाल निरीक्षण गृहात होता. तीन दिवसांपूर्वी तो तेथून फरार झाला होता. त्यानंतर त्याने कुलूपबंद घर हेरुन चोरी केली होती. त्या विधिसंघर्षग्रस्त बालकावर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये चोरी, घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.