यंग चांदा ब्रिगेडतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:24 AM2021-03-22T04:24:50+5:302021-03-22T04:24:50+5:30
चंद्रपूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यंग चांदा ब्रिगेड युवती विभागाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवतींचा ...
चंद्रपूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यंग चांदा ब्रिगेड युवती विभागाच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवतींचा सत्कार सोहळा यंग चांदा ब्रिगेेडच्या जैन भवनजवळील कार्यालयात पार पडला. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते कर्तृत्वान युवतींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी कल्याणी जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, नगरसेविका सुनीता लोढीया आदी उपस्थित होते. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय काम केले जात आहे. दरम्यान, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या युवतींचा सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. प्रेरणा भास्कर सहारे, पोलीस विभागाच्या प्रज्ञा गावडे, आकाशवाणीच्या निवेदिका तथा गोंडवाना विद्यापीठाच्या प्राध्यापिका वर्षा कोल्हे, क्रीडाक्षेत्रातील संगीता बामबोडे, डाॅ. दिशा चांदेकर, माॅडल पूजा पाॅल, उत्तम विद्यार्थी मयूरी आश्राम, एमबीएमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या रुचिता गर्गेलवार, एमएसईबीच्या दक्षता अधिकारी सुप्रिया भगत, ग्रामपंचायत सदस्या प्रतीक्षा देऊळकर, एमएसईबी विभागाच्या तृप्ती हलदार, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती मेश्राम, कराटेपट्टू ज्योती जयपूरकर, कवयित्री दिव्या हातगावकर, शिल्पा कोंडावार, कोरोनायोद्धा सपना बावणे, इंजी प्राजक्ता उपरकर यांच्यासह एसटी महामंडळात कार्यरत १३ युवतींचा सत्कार करण्यात आला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आशा देशमुख, दुर्गा वैरागडे, विमल काटकर, नंदा पंधरे, सोनाली आंबेकर, कल्पना शिंदे, वैशाली मद्दिवार, वैशाली रामटेके, सविता दंडारे, कौसर खान, डाॅली देशमुख, प्राची नंदलवार, वैष्णवी निनजे, गायत्री येलाडे, वैशाली पिदूरकर, जास्मीन शेख आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक भाग्यश्री हांडे, आभार सुरेखा काटंगे यांनी मानले.