प्रदूषणासह चंद्रपूर तापमानात देशात अव्वल स्थानी आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांपासून संरक्षण होण्यासाठी प्रत्येक जण उपाययोजना करतात. ग्रामीण भागामध्ये घरासमोर मांडव टाकल्या जातो. मात्र शहरातील सर्वसामान्य नागरिकांना कूलरशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे प्रत्येक आपआपल्या परीने कूलर लावून तापमानापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मागील दोन वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी कूलरच्या किमती वाढल्या असून विविध उंचीनूसार कूलरचे भाव ठरले आहे. विशेष म्हणजे, कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन होण्याची शक्यता असल्यामुळे सावध होत व्यावसायिकांनीही मोजकेच कूलर विक्रीसाठी आणले आहे. सध्या कोरोनाचे सावट पुन्हा घोंगावत आहे. परिणामी व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.
बाॅक्स
व्यावसायिकांची चिंता वाढली
मागील वर्षी लाॅकलाऊन करण्यात आले. त्यामुळे विक्रीसाठी आणलेले कूलर विकताच आले नाही. परिणामी मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून व्यावसायिकांनी तयारी केली. मात्र आता रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे पुन्हा लाॅकडाऊन होते की, काय अशी अवस्था आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंता वाढली आहे.
खसची मागणी
काही नागरिकांनी अडगळीत ठेवलेले कूलर बाहेर काढले असून त्याची दुरुस्तीही केली आहे तर काहींनी पेंटींग तसेच खस लावली आहे. त्यामुळे यावर्षी खसची मागणी वाढली आहे. दरम्यान, व्यावसायिकांनी ४ ते ५ किलो खसच्या प्लास्टिक पिशव्या तयार केल्या असून त्याद्वारे ते विक्री करीत आहे. सध्या ५ किलोसाठी १३० ते १४० रुपये मोजावे लागत आहे.