गॅस सिलिंडरचे वाढविले २२५ अन्‌ कमी केले १० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:28 AM2021-04-04T04:28:46+5:302021-04-04T04:28:46+5:30

घरगुती गॅसधारक महिन्याकाठी सिलिंडरची उचल करतात. उज्ज्वला योजनेंतर्गत शेकडो लाभार्थी आहेत; मात्र आता गॅसचे दर परवडत नसल्यामुळे त्यांनी पुन्हा ...

Increased 225 eggs of gas cylinder reduced to Rs | गॅस सिलिंडरचे वाढविले २२५ अन्‌ कमी केले १० रुपये

गॅस सिलिंडरचे वाढविले २२५ अन्‌ कमी केले १० रुपये

Next

घरगुती गॅसधारक महिन्याकाठी सिलिंडरची उचल करतात. उज्ज्वला योजनेंतर्गत शेकडो लाभार्थी आहेत; मात्र आता गॅसचे दर परवडत नसल्यामुळे त्यांनी पुन्हा सरपण गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. मार्च महिन्यामध्ये ८०० रुपयांवर घरगुती गॅस सिलिंडरचे भाव गेले होते. त्यामुळे ग्राहकांच्या संतापात आणखीच भर पडली.

कोरोनामुळे यावर्षी जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांच्या हातचा रोजगार गेला. त्यामुळे जगण्याचा प्रश्न कायम आहे. मागील तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये थेट २२५ रुपयांचे गॅस सिलिंडरचे दर वाढले आहे. दरम्यान, १ एप्रिलपासून सिलिंडरचे नवे दर लागू करण्यात आले आहे. यात केवळ दहा रुपयांनी सिलिंडर स्वस्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अनुदानही बंद झाले आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घरगुती सिलिंडर ६५० रुपयांपर्यंत मिळत होते. त्यामध्ये वाढ होत आज ८८० रुपयांवर सिलिंडरचे भाव पोहोचले आहे. वर्षभरात २२५ रुपयांनी सिलिंडरची दरवाढ झाली आहे. दरवाढ वेगाने झाली असताना केवळ १० रुपयांनी सिलिंडरचे दर कमी केले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

कोट

घरगुती गॅस सिलिंडरचे भाव वाढवून गरिबांना जगणे कठीण केले आहे. हातावर आणून खाणाऱ्यांचे चांगलेच हाल होत आहेत, त्यामुळे शासनाने सिलिंडरचे भाव कमी करून दिलासा देणे गरजेचे आहे.

-प्रतिभा कोडापे

चंद्रपूर

कोट

मागील वर्षभरामध्ये २२५ रुपयांनी सिलिंडरचे दर वाढविले आहे. त्यामुळे गोरगरिबांना गॅस सिलिंडरवर स्वयंपाक करणे कठीण झाले आहे. ज्या उद्देशासाठी उज्ज्वला गॅस वितरित केले, त्या उद्देशालाही हळताल फासला आहे. अनेकांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करणे सुरू केले आहे.

-रिना शहाने

चंद्रपूर

--

कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून सामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्यामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच गॅस सिलिंडरचे दर वाढले आहे; मात्र केवळ १० रुपयांनी कमी करून सामान्य नागरिकांच्या तोंडाला पाणे पुसली आहेत.

-मीनाक्षी मडावी

चंद्रपूर.

बाॅक्स

नोव्हेंबर २०२०-६६४

डिसेंबर २०२०-७१५

जानेवारी २०२१-७६०

फेब्रुवारी २०२१ ७८५

मार्च २०२१-८८०

एप्रिल २०२१-८७०

बाॅक्स

कोरोना संकट काळात जीवनावश्यक वस्तुंचे दर कमी होण्याऐवजी वाढले, त्यामुळे सामान्य नागरिकांना जगणे कठीण झाले आहे. हातातला रोजगार गेला. अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले. एवढेच नाही तर मजुरीही मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे प्रत्येकांना जगण्याची चिंता आहे. असे असतानाही डिझेल, पेट्रोलच्या किमतीत वाढ झाल्यामुळे महागाई हाताच्या बाहेर गेली आहे. प्रत्येक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत, त्यामुळे आवक कमी आणि जावक जास्त, अशी अवस्था गरिबांची झाली आहे. त्यातच सिलिंडरचे दर वाढवून शासनाने गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारने गॅस सिलिंडरचे दर कमी करून सामान्य ग्राहकांना दिलासा देणे गरजेचे आहे.

Web Title: Increased 225 eggs of gas cylinder reduced to Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.