सामाजिक शास्त्राच्या प्राध्यापकांची जबाबदारी वाढतेय
By admin | Published: August 28, 2014 11:41 PM2014-08-28T23:41:48+5:302014-08-28T23:41:48+5:30
आधुनिकतेकडे वाटचाल करताना प्रत्येक पिढीचे नैतिक मूल्य काळपरत्वे बदलत आहे. समाज ही अभ्यासक्रमाची प्रयोगशाळा असल्यामुळे आधुनिक काळात आपण झपाट्याने प्रगती करीत असलो तरी,
चंद्रपूर : आधुनिकतेकडे वाटचाल करताना प्रत्येक पिढीचे नैतिक मूल्य काळपरत्वे बदलत आहे. समाज ही अभ्यासक्रमाची प्रयोगशाळा असल्यामुळे आधुनिक काळात आपण झपाट्याने प्रगती करीत असलो तरी, नैतिक मूल्य घसरत आहे. तेव्हा सामाजिकशास्त्र हे विविध शाखांच्या अभ्यासक्रमाचा पाया आहे. त्यामुळे सामाजिक विषयांचे अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांची जबाबदारी वाढत असल्याचे मत राज्य प्राचार्य फोरमचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नंदकुमार निकम यांनी केले.
विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे पुरस्कृत सात दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी चंद्रपुरात बोलत होते. ‘सामाजिक शास्त्राच्या माध्यमातून नैतिक मूल्य शिक्षणाचे संवर्धन’ हा कार्यशाळेचा विषय होता. यावेळी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे, ज्येष्ठ अभ्यासक डॉ. कायदे, डॉ. श्याम कोरोटी, डॉ. एल. व्ही. शेंडे, प्राचार्य डॉ. जे.ए. शेख, उपप्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले,, समन्वयक डॉ. प्रकाश शेंडे यांची उपस्थित होती.
सद्यपरिस्थितीत मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत आहे. नैतिक मुल्यांचे संवर्धण होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत शांताराम पोटदुखे यांनी व्यक्त केले.
सात दिवस विविध सामाजिक शास्त्रीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचा समारोप ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. कोकडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. पी. इंगोले, पदव्युत्तर विभागाचे समन्वयक प्रा. स्वप्नील माधमशेट्टीवार, डॉ. प्रकाश शेंडे, डॉ. अक्षय धोटे यांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)