आंतरराष्ट्रीय युवा दिनी आरोग्य जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:32 AM2021-08-13T04:32:24+5:302021-08-13T04:32:24+5:30
चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त गुरूवारी संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था चंद्रपूरद्वारा संचालित लिंक वर्कर प्रकल्पांतर्गत मूल तालुक्यातील राजोली ...
चंद्रपूर : आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त गुरूवारी संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था चंद्रपूरद्वारा संचालित लिंक वर्कर प्रकल्पांतर्गत मूल तालुक्यातील राजोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य जागृती कार्यक्रम घेण्यात आला होता. अध्यक्षस्थानी राजोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आसमा शेख, एड्स नियंत्रण विभागाचे जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरूळकर, लिंक वर्कर प्रकल्पाचे डीआरपी रोशन आकुलवार उपस्थित होते. डॉ. शेख यांनी युवा दिनाचे महत्त्व सांगितले. पर्यवेक्षक मंगरूळकर यांनी आरोग्य, युवा जागृती अनुषंगाने मार्गदर्शन केले. डीआरपी आकुलवार म्हणाले, युवक-युवतींनी सामाजिक भान जोपासून नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी जागृती घडवून आणली पाहिजे. देशाचे भवितव्य तरुणाईच्या खांद्यावर असल्याचे त्यांनी नमूद केले. आयोजन लिंक वर्कर प्रशांत कवाडे यांनी केले. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.