वीज केंद्रातून तीन ट्रकमधून लोखंड चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:08 AM2019-02-24T00:08:39+5:302019-02-24T00:09:36+5:30
वीज केंद्रातील वेस्टेज फलॉयअॅश वाहतुक करणाऱ्या तीन वाहनातून लोखंड चोरून नेताना केंद्राच्या सुरक्षा विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी दुपारी ३.३० वाजता पडोली येथील एका भंगार दुकानात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वीज केंद्रातील वेस्टेज फलॉयअॅश वाहतुक करणाऱ्या तीन वाहनातून लोखंड चोरून नेताना केंद्राच्या सुरक्षा विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवारी दुपारी ३.३० वाजता पडोली येथील एका भंगार दुकानात करण्यात आली.
चंद्रपूर वीज केंद्रातून फ्लॉय अॅशमध्ये वेस्टेज राख टाकण्याचे कंत्राट विजय गिते यांच्या विजय इंटरप्रायसेस कंपनीला देण्यात आले. शनिवारी दुपारी एमएच ३४ एम ९४९२, एमएच ०४ एजी २०२० आणि एमएच १९ झेड २८७९ क्रमांकाच्या तीन वाहनातून वीज केंद्रातील राख भरून रिजेक्ट गेटमधून बाहेर निघाले. सदर गेटवर सीआयएसएफचे सुरक्षा कर्मचारी तैनात राहतात. मात्र त्यांची नजर चुकवून ही वाहने अॅश बॅन्ड परिसरात पोहोचली. त्या ठिकाणी फ्लॉय अॅश रिकामे केल्यानंतर वीज केंद्रातील लोखंड वाहनामध्ये लपवून ठेवले होते. लोखंड विकण्याकरिता पडोलीतील एका भंगार दुकानात पोहोचले. ही माहिती वीज केंद्रातील सुरक्षा कर्मचाºयाला मिळाली. दरम्यान, भंगार दुकानात लोखंड विकत असताना चालकासह सहाही आरोपींना रंगेहात पकडले. वीज केंद्राने दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या लोखंडाची किंमत ३१ हजार रूपये आहे. पोलिसांनी तिनही वाहनाचे चालक व वाहक अशा सहा जणांना अटक केली. या घटनेचा अधिक तपास केल्यास संबंधित कंत्राटदार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
विजय इंटरप्रायजेस कंपनीच्या ट्रकमधील राखेमध्ये भंगार लपवून ठेवले होते. सुरक्षा कर्मचाºयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केली आहे. ३१ हजार ६७५ रूपये या भंगाराची किंमत आहे. चौकशीत आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
- दीपक खोब्रागडे,
पोलीस निरीक्षक, दुर्गापूर.