वेकोलीच्या सास्ती कोळसा खाणीत लोखंड चोरी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:30 AM2021-09-21T04:30:32+5:302021-09-21T04:30:32+5:30
सास्ती येथील आरसी ऑफिसच्या वर्कशॉपमधील १५ हजार रुपये किमतीचे लोखंड जप्त करण्यात आला आहे. ...
सास्ती येथील आरसी ऑफिसच्या वर्कशॉपमधील १५ हजार रुपये किमतीचे लोखंड जप्त करण्यात आला आहे. ही माहिती महाराष्ट्र सुरक्षा बलचे प्रभारी अधिकारी नामदेव सोनटक्के व सुरक्षा अधिकारी एस. एस. ठाकरे, तसेच वेकोलीचे सुरक्षा अधिकारी राजूरकर यांना दिली. त्यांनी रीतसर तक्रार नोंदविली. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी महेंद्र वर्मा (२४) याच्यासह राजा वर्मा (२५), बंटी वर्मा (२२), चीनु वर्मा (२३), आसू (२६) व अन्य तीन सर्व रा. घुग्घूस फाईल सरदार पटेल वार्ड बल्लारपूर अशा एकूण आठ जणांविरुद्ध भादंविच्या कलम ३८० व ४६१, ३४ नुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे.
चोरट्यासोबत वेकोलीचे हितसंबंध?
महाराष्ट सुरक्षा बलाच्या जवानांनी ही चोरी पकडली. वेकोलीचे सुरक्षा अशा चोरी प्रकरणात बघ्याची भूमिका घेत असल्याने त्यांचे चोरट्यांसोबत हितसंबंध असल्याचा आरोप होत आहे. अधिक तपास राजुराचे ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल कुळमेथे व त्याचे सहकारी करीत आहेत.