जेसीपीने रस्ता खोदून अडविला रेती तस्करांचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:17 AM2021-02-22T04:17:14+5:302021-02-22T04:17:14+5:30
शुक्रवारी मंडळ अधिकारी किशोर नवले व तलाठी पिल्लई यांनी हल्या घाटावरून रेती भरून येणाऱ्या ट्रॅक्टरला पकडले. त्यानंतर रस्त्यावर जेसीपीने ...
शुक्रवारी मंडळ अधिकारी किशोर नवले व तलाठी पिल्लई यांनी हल्या घाटावरून रेती भरून येणाऱ्या ट्रॅक्टरला पकडले. त्यानंतर रस्त्यावर जेसीपीने खड्डे खोदून रस्ताच बंद केला आहे.
वर्धा नदीच्या घुग्घुस, नकोडा, चिंचोली, घोडाघाट, हल्ल्या घाट आहेत. या घाटांवरून रेती उत्खनन करणारे ट्रॅक्टर पकडून दंडात्मक व पोलीस कारवाया झाल्या. मात्र, रेती तस्करांवर कोणताही परिणाम झाला नाही. १४ जानेवारीला याच नदीवरील हल्ल्या घाटावर पहाटे चंद्रपूर एसडीओने धाड टाकून एकाचवेळी २४ ट्रॅक्टर पकडले होते. दंड न भरल्याने अजूनही बरेच ट्रॅक्टर तलाठी कार्यालयात उभे आहे. मात्र, रेती तस्करांनी बाहेरगावाहून दुसरे ट्रॅक्टर बोलावून रेती तस्करी सुरूच ठेवली हाेती.