लालनाला प्रकल्प शेतकऱ्यांना देणार नवसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:29 AM2021-09-25T04:29:37+5:302021-09-25T04:29:37+5:30
चिमूर : चिमूर तालुक्यातील खडसंगी परिसरातील बोथली, आमडी, खुर्सापार, चिचघाट या परिसरातून लालनाला प्रकल्प होणार असून हा प्रकल्प शेतकऱ्यांना ...
चिमूर : चिमूर तालुक्यातील खडसंगी परिसरातील बोथली, आमडी, खुर्सापार, चिचघाट या परिसरातून लालनाला प्रकल्प होणार असून हा प्रकल्प शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारा ठरणार आहे.
प्रकल्पामुळे परिसरातील शेकडो हेक्टर जमीन पाणीदार होणार आहे. याचा फायदा खडसंगी परिसरातील अनेक शेतकऱ्यांना होऊन वाढीव मोबदला मिळावा, याकरिता चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन लालनाला प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी भाजपाचे वसंत वारजूकर, भाजप तालुका अध्यक्ष राजू झाडे एकनाथ थुटे आदी उपस्थित होते.
खडसंगी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती लालनाला प्रकल्पात जाणार असून यामुळे शेतकऱ्यासाठी लालनाला प्रकल्प नवसंजीवनी ठरणार आहे. या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्याच्या शेती पाणीदार होणार असून, ज्या शेतकऱ्याच्या शेतातून हा प्रकल्प जाईल त्यांना या जमिनीचा मोबदला मिळणार आहे. मात्र तो मोबदला वाढवून देण्यात यावा. याकरिता आमदार बंटी भांगडियांचे प्रयत्न सुरु आहेत.
240921\1342-img-20210924-wa0027.jpg
लालनाला प्रकल्प शेतकऱ्याना देणार नवसंजीवनी.
आमदार भांगडीयाची जिल्हाधिकारी सोबत 20 कलमी बैठक