बनावट एटीएम बनवून खात्यातील रक्कम लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:55+5:302021-06-03T04:20:55+5:30
पैसे काढल्यासंदर्भात मेसेज कातकर यांच्या मोबाईलवर येताच त्यांनी लगेच आपल्या खात्यातील पैसे आपल्या दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले. ...
पैसे काढल्यासंदर्भात मेसेज कातकर यांच्या मोबाईलवर येताच त्यांनी लगेच आपल्या खात्यातील पैसे आपल्या दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले. अन्यथा पुन्हा या चोरट्याने खाते साफ केले असते. दुसऱ्यादिवशी डॉ. सत्यपाल कातकर यांनी या घटनेबाबत बँक ऑफ इंडिया, राजुरा शाखेला व राजुरा पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली. विशेष म्हणजे या खात्याचे एटीएम कार्ड डॉ. सत्यपाल कातकर यांच्याकडेच होते व यादरम्यान त्यांना कुठलीही ओटीपी नंबर आला नाही व त्यांनी या खात्याबाबत कुठलीही माहिती कुणाला दिली नव्हती. मात्र त्यांचे फेसबुक अनब्लॉक करताच काही वेळातच ही रक्कम बनावट एटीम कार्ड बनवून काढण्यात आली. त्यामुळे त्यांनी बँक खात्यामध्ये असणाऱ्या रकमेच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.