प्रधानमंत्री जन-धन योजनेचा शुभारंभ
By Admin | Published: August 28, 2014 11:41 PM2014-08-28T23:41:10+5:302014-08-28T23:41:10+5:30
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री जन- धन योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते आज गुरुवारी बँक आॅफ इंडिया या लिड बँकेच्या चंद्रपूर शाखेत शुभारंभ करण्यात आला.
चंद्रपूर : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री जन- धन योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते आज गुरुवारी बँक आॅफ इंडिया या लिड बँकेच्या चंद्रपूर शाखेत शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाव्यवस्थापक सुबेसिंग, डेकाटे, संजय हिरेमठ, श्रीधर नारलावार, खेडीकर, अंजनकर व अन्य बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री जन- धन योजनेचा शुभारंभ दिल्ली येथे केला. त्याचवेळी देशभरात सर्वच राज्यात या योजनेचा शुभारंभ स्थानिक स्तरावर करण्यात आला. चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी या योजनेचा शुभारंभ केला. प्रधानमंत्री जन- धन योजना म्हणजे आर्थिक प्रगतीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल होय, असे त्यांनी सांगितले. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील १०० टक्के नागरिकांना मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी बँक व्यवस्थानाकडून केली.
प्रधानमंत्री जन-धन योजनेत बँक खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून सामान्य माणसाची रक्कम व्याजासह सुरक्षित ठेवण्याची हमी यात आहे. बँक खाते उघडण्यासाठी कुठलीही ठेव ठेवण्याची अट नसून खातेदारास एक लाख रुपयांचा अपघात विमा देण्यात येणार आहे. यासोबतच एटीएमसुध्दा देण्यात येईल. (शहर प्रतिनिधी)