लर्निंग लायसन्सधारकांना मिळणार आता मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:00 AM2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:01:03+5:30
लॉकडाऊनपूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून अनेकांनी लर्निंग लायसन्स प्राप्त केले. लॉकडाऊ झाल्याने कामकाजावर मर्यादा आल्या. त्यामुळे लायसन्सची मुदत संपलेल्यांची चिंता वाढली होती. ठरलेल्या तारखेवर उपस्थित राहून पुढील वैद्यकीय आणि इतर चाचण्या होतात की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. सप्टेंबर २०१९ पासून लर्निंग लायसन्स प्राप्त केलेल्या उमेदवारांना मार्च २०२० पासून पुढे नंतरची तपासणीची तारीख देण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे शासकीय कामकाजावरही निर्बंध घालण्यात आले. परिणामी या कालावधीत जिल्ह्यातील तीन ते चार हजार लर्निंग लायसन्सधारकांची वैधता मुदत संपुष्टात आल्याने अनेकांची चिंता वाढली होती. या समस्येवर उपाय करण्यासाठी आता परिवहन विभागाने लर्निंग लायसन्सची वैधता वाढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे परवानाधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
लॉकडाऊनपूर्वी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून अनेकांनी लर्निंग लायसन्स प्राप्त केले. लॉकडाऊ झाल्याने कामकाजावर मर्यादा आल्या. त्यामुळे लायसन्सची मुदत संपलेल्यांची चिंता वाढली होती. ठरलेल्या तारखेवर उपस्थित राहून पुढील वैद्यकीय आणि इतर चाचण्या होतात की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. सप्टेंबर २०१९ पासून लर्निंग लायसन्स प्राप्त केलेल्या उमेदवारांना मार्च २०२० पासून पुढे नंतरची तपासणीची तारीख देण्यात आली होती. त्याचवेळी २१ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. या परिस्थितीत जिल्ह्यात किमान तीन ते चार हजारापेक्षाही अधिक उमेदवारांना पुन्हा चाचणी देण्याची वेळ येणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. यावर परिवहन आयुक्तांनी १७ मे रोजी पत्र काढून लर्निंग लायसन्सची वैधता ३० जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात वैधता संपुष्टात येणाऱ्यांना त्यापुढील तारीख देत तपासणी केली जाणार असल्याने या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
असे आहे निर्देश
कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे मोटार वाहन अधिनियम १९८८ व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ अंतर्गत संबंधित विविध कागदपत्रांच्या वैधतेबाबत केंद्र शासनाने राज्याला निर्देश दिले आहेत.