लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : येथील मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शंकरपूर व परिसरातील विविध ठिकाणची घरे व काही लोकांच्या गुरांच्या गोठ्यांची पडझड झाली असून अनेक लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने एकाही घटनेत जीवितहानी झालेली नाही.मागील चार दिवसांपासून परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. यात शंकरपूर येथील अनेक घरे पडली असून अनेक घरामध्ये पाणी शिरले आहे.अनेकांनी घरातील पाणी फेकण्यासाठी रात्र जागून काढल्या आहेत. यात शंकरपूर येथील संजय ढोक, बाळकृष्ण ढोक, शालिक लहाने, अनंता येळने, विनोद वांढरे, रामदास वांढरे, उषाबाई रासेकर, गुरुदास डबरे, जनाबाई भजभूजे, रमेश लहाने, किशोर बोधे, ममता डांगे, गुरू चौधरी, डोमळाबाई शेरकी, बाबुराव सावसाकड़े, सरस्वती जांभुळे, सुभद्रा सावसाकडे, कल्पना रासेकर या अनेक लोकांची घरे पडली असून यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तर अनेक लोकांच्या जीवनोपयोगी वस्तु मलब्यात दबलेल्या असून नागरिकांच्या सहकार्याने त्या काढण्यात आल्या आहेत. सध्या काहींनी शेजारील घरी तर काहींनी नातेवाईकांच्या घरी तात्पुरता आसरा घेतला आहे. पडझड झालेल्या घरांच्या नुकसानीसाठी लवकरात लवकर शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.अनेकांना घरकुलाचा लाभ नाहीशासन घरकुल योजना राबवित असले तरी यात कोणतेही नियोजन नाही. गरजवंताला घर मिळत नाही. व काही लोक आपण दारिद्र्य रेषेखाली आहोत, याचा फायदा घेत वडिलांच्या नावाने वेगळे घर व मुलांच्या नावाने वेगळे घर, असा लाभ घेत आहेत. शासनाने आतातरी गरजवंताला घर दिले तर लोकांना या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.इरई धरणाचे दोन दरवाजे उघडलेइरई धरणात सातत्याने पाणीसाठा जमा होत असल्याने आज गुरुवारी दुपारनंतर इरई धरणाचे पहिला आणि सातवा हे दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे इरई नदी वाढून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी नदीकाठावरील लोकांनी सतर्क रहावे, असा इशारा दिला आहे.
संततधार पावसामुळे शंकरपूर येथील अनेक घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 1:02 AM