चंद्रपूर : आर्य वैश्य समाजातर्फे महापौर राखी संजय कंचर्लावार यांचा कोरोना योद्धा म्हणून शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कोरोनासारख्या महामारीच्या संकटकाळात महापौर राखी कंचर्लावार यांनी कंटेनमेंट झोन असो किंवा कोविड सेंटर, कोरोना पॉझिटिव्ह सेंटर असोत प्रत्येक ठिकाणी स्वतः काळजीपूर्वक लक्ष दिले. नागरिकांना कुठलीही कमतरता भासू नये, त्यांना दोन वेळचे जेवण, सकाळचा नाश्ता, दूध, मेडिकल किट अशा आवश्यक असे साहित्य महानगरपालिकेकडून महापौर यांच्या सूचनेप्रमाणे पुरविण्यात आले, तसेच हातावरचे पोट असणाऱ्या दोन वेळच्या जेवणाचे डब्बे पुरविण्यात आले. रेशन कार्ड नसणाऱ्यांना धान्याची किट, दिव्यागांना मदत, विशेष निधीतून आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून मिळालेला रुग्णवाहिका व शववाहिका मेडिकल कॉलेजला कोविडच्या काळात रुग्णांसाठी सुपूर्त करण्यात आल्या. त्यामुळे महापौर राखी कंचर्लावार यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी विजय गंपावार, अविनाश उत्तरवार, मनोज राघमवर, प्रवीण उपगनलावर, व्यंकटेश उपगनलावर, गिरीश उपगनलावर, शंकर गंगशेट्टीवार आदी उपस्थित होते.
कोरोना योद्धा म्हणून महापौरांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:30 AM