‘लॉकडाऊन’ काळातही एचआयव्ही रूग्णांच्या घरी औषधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 05:00 AM2020-04-27T05:00:00+5:302020-04-27T05:00:54+5:30

थेट रूग्णांच्या घरी औषधी पोहचवण्याचे आव्हानात्मक काम संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थाद्वारा संचालित लिंक वर्कर प्रकल्प, नोबल शिक्षण संस्था, जनहिताय मंडळ, संबोधन ट्रस्टने स्वीकारले. लॉकडाऊन काळात सुमारे दीडहजार रूग्णांपर्यंत तीन महिन्याची औषधी पोहचवली. परजिल्ह्यातील १३५ रूग्ण व वणी ग्रामीण रूग्णालयातील २०० एचआयव्ही रूग्णांना औषधी दिली.

Medication at home of HIV patients even during the 'lockdown' period | ‘लॉकडाऊन’ काळातही एचआयव्ही रूग्णांच्या घरी औषधी

‘लॉकडाऊन’ काळातही एचआयव्ही रूग्णांच्या घरी औषधी

Next
ठळक मुद्देहजारो कुटुंबीयांंना दिलासा : जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे कौतुकास्पद नियोजन

राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊनमुळे शहरे व गावे बंदिस्त होताच एचआयव्ही रूग्णांच्या छाती धडकी भरली. हे रूग्ण दर महिन्याला जिल्हा सामान्य रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयाच्या एसआरटी केंद्रातून औषधी घ्यायचे. कोरोना विषाणूविरूद्ध संपूर्ण आरोग्य यंत्रणेकडून झुंज सुरू असतानाच संभाव्य धोका ओळखून जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे कौतुकास्पद नियोजन केले. शेकडो लिंक वर्करने जीवाची पर्वा न करता सुमारे दीडहजार एचआयव्ही रूग्णांच्या घरी जाऊन औषधी पोहोचवली.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील १ हजार ५०० रूग्णांना जिल्हास्तरावरील एसआरटी केंद्रातून औषधी घेण्याचे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राठोड यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांच्या नेतृत्वात बैठका घेऊन एक्शन प्लॉन तयार करण्यात आला. लगेच एआरटी औषधांचा कालावधी संपणाऱ्या रूग्णांची यादी बनवून तालुकास्थळी औषधी पोहचवण्याची तयारी सुरू केली. त्यानंतर एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र तसेच स्वयंसेवी संस्थांनी मोबाईलद्वार ेरूग्णांशी संपर्क साधला. आयसीटीसी समुपदेशकांनी तालुक्यातील रूग्णांना औषधी मिळावी, यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ निरंतर सेवा दिली. मात्र, जे रूग्णालयात येऊ शकत नाही, अशापर्यंत औषध पोहचविणे हे सर्वात आव्हानात्मक काम होते. सर्व आईसीटीसी समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व अन्य १३० कर्मचाऱ्यांनी एक्शन प्लॉन यशस्वी करून दाखविला. यासाठी एआरटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी, डॉ. श्रीकांत जोशी, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरूळकर,लिंक वर्कर प्रकल्पाचे रोशन आकुलवार, संगिता देवाळकर आदींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती.

स्वयंसेवी संस्थांची तत्परता
थेट रूग्णांच्या घरी औषधी पोहचवण्याचे आव्हानात्मक काम संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थाद्वारा संचालित लिंक वर्कर प्रकल्प, नोबल शिक्षण संस्था, जनहिताय मंडळ, संबोधन ट्रस्टने स्वीकारले. लॉकडाऊन काळात सुमारे दीडहजार रूग्णांपर्यंत तीन महिन्याची औषधी पोहचवली. परजिल्ह्यातील १३५ रूग्ण व वणी ग्रामीण रूग्णालयातील २०० एचआयव्ही रूग्णांना औषधी दिली. विहान प्रकल्प अंतर्गतही औषधी वाटप व आवश्यक मदत केली.

लॉकडाऊन संपेपर्यंत कार्य निरंतर सुरू राहणार आहे. एकाही एचआयव्ही रूग्णाला औषधीविना राहावे लागणार नाही, यांची खबरदारी घेतली जात आहे.
-सुमंत पानगंटीवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, डापकू, चंद्रपूर

Web Title: Medication at home of HIV patients even during the 'lockdown' period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :HIV-AIDSएड्स