राज्यशास्त्र विषयाचा विकास घडवून येणाऱ्या नविन शैक्षणिक धोरणात राज्यशास्त्र विषयासमोरील आव्हान पेलवून विषयाचे अस्तित्व टिकवून ठेवणे हे परिषदेचे ध्येय आहे. राज्यशास्त्राच्या विकासासाठी संघटनात्मक बांधणी करणे आणि प्राध्यापकांत अधिकाधिक सुसंवाद साधणे ही काळाची गरज असल्याचे सांगून प्रत्येकांनी स्थानिक पातळीवर राज्यशास्त्र विषयाच्या सर्व प्राध्यापकांशी संपर्क करून संघटन वाढविण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे मत प्रा. सुमित पवार यांनी व्यक्त केले. याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष शरद जोगी यांनीही आपले मत व्यक्त केले. प्रास्ताविक नागपूर विभाग अध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल, संचालन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा. संतोष निखाते तर परिचय प्रा. रविकांत जोशी यांनी करून दिला.
आभार डॉ. भास्कर मदनकर यांनी मानले. या कार्यक्रमाला चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक उपस्थित होते.