चंद्रपूरमध्ये महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जाणून घेतले आनंदी जीवनाचे रहस्य

By साईनाथ कुचनकार | Published: May 10, 2023 05:38 PM2023-05-10T17:38:45+5:302023-05-10T17:39:49+5:30

सांस्कृतिक मंत्रालयाने हर घर ध्यान अभियानद्वारे एक सकारात्मक पाऊल उचलले आहे.

Municipal officials, employees learned the secret of a happy life in chandrapur | चंद्रपूरमध्ये महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जाणून घेतले आनंदी जीवनाचे रहस्य

चंद्रपूरमध्ये महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जाणून घेतले आनंदी जीवनाचे रहस्य

googlenewsNext

चंद्रपूर : महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण असतो. तणावाचा केवळ मानसिक आरोग्यावर परिणाम होत नाही तर शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. हा ताण कमी करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आयुक्त विपीन पालिवाल यांच्या मार्गदर्शनात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आनंदी जीवनाचे रहस्य जाणून घेतले.

सांस्कृतिक मंत्रालयाने हर घर ध्यान अभियानद्वारे एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून हर घर ध्यान अभियान १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत देशभरात चालविले जाणार आहे. त्याअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेत ध्यान शिबिर घेण्यात आले. 
शिबिराच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मुग्धा तरुण खांडे यांच्या पुढाकारातून योगिता वानखेडे, रवींद्र लाखे, वृंदा लाखे, प्रीती संघवी, स्वाती बच्चूवार या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या चमूने मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांना तणाव व्यवस्थापन व आनंदी जीवनाचे रहस्य याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी कर्मचाऱ्यांसाठी आनंदी राहण्याचे तंत्र व तणाव मापन चाचणी घेण्यात आली.

आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी सर्वांनी निरोगी आयुष्य जगण्याच्या दृष्टीने व्यायाम तसेच योग व ध्यान करण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई, मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे, सहायक संचालक नगररचना सुनील दहीकर, उपअभियंता विजय बोरीकर, अनिल घुमडे तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Municipal officials, employees learned the secret of a happy life in chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.