नुकतीच नागपूर महामेट्रोची ८८१ पदांसाठी पदभरती घेण्यात आली. यासाठी अनेकांनी अर्ज केले होते. परंतु, महामेट्रोने आरक्षण धोरणाला बगल देत एससी, एसटी, इडब्ल्यूएस जागांची भरती कमी करून खुल्या प्रवर्गाची ३५७ जागा असताना ६९० युवकांना प्राधान्य देण्यात आले. असंविधानिक मार्गाने महामेट्रोकडून हा घोटाळा करण्यात आला. हा मागासवर्गीयांवरी अन्याय आहे. त्यामुळे महामेट्रोने ती चूक सुधारावी, असेही शिवानी वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
बॉक्स
नागपूर येथे आंदोलन
महामेट्रोच्या पदभरतीत बहुजन समाजातील युवकांना डावलण्यात आल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे महामेट्रोच्या मुख्यालयासमोर निदर्शने करण्यात आली होती. यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे सचिव शिवा राव, युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव बंटी शेलके, युवक कॉंग्रेसचे महासचिव इर्शाद शेख, सचिन कत्याल, युवक कॉंग्रेसचे सचिव अतुल मल्लेलवार, अक्षक हेटे, हरीश कोत्तावार, कुणाल पेंदोरकर, नितीन दुव्वावार, चहारे, आदी सहभागी झाले होते.