पळसगाव (पिपर्डा) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवनकार्य तत्त्वज्ञान व समग्र साहित्याचे तसेच अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज आश्रमाच्या तत्त्वप्रणालीचे व कार्यप्रणालीचे अध्ययन करून ग्रामगीता जीवन -विकास परीक्षा उत्तीर्ण करून आणि प्रचाराची दीक्षा ग्रहण केल्याबद्दल नत्थुजी श्रीहरी भोयर यांना ग्रामगीताचार्य या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्वोच्च पदवीने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी जि. अमरावतीच्या वतीने ग्रामगीता जीवन विकास परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांना ग्रामगीताचार्य या सर्वोच्च पदवीने सन्मानित करण्यात येते. ही परीक्षा देण्यासाठी व राष्ट्रसंताच्या जीवन प्रणालीवर अनेक परीक्षा द्यावे लागतात. नत्थुजी भोयर यांनी महाराजांच्या तत्त्वप्रणालीवर विश्वास ठेवून त्यांच्या कार्याची माहिती घेऊन ही परीक्षा उत्कृष्टपणे उत्तीर्ण करून ग्रामगीताचार्य या पदवीने सन्मानित झाले. यावेळी प्रकाश वाघ महाराज, परीक्षा विभाग प्रमुख निमजे, अध्यक्ष गुलाबराव गवसे महाराज, सरचिटणीस जनार्दन बोथे, सचिव गोपाल कडू उपस्थित होते.
260721\img-20210725-wa0159.jpg
ग्रामगीताचार्य पदवीने सन्मानित करताना मान्यवर मंडळी