दिव्यांग सक्षमीकरणासाठी ध्यान साधनेची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:55 AM2020-12-04T04:55:57+5:302020-12-04T04:55:57+5:30
चंद्रपूर : दिव्यांग बांधवात विविध कौशल्य आहेत. स्वर्क्तृत्वावर लढ्यण्याची धमक आहे. त्यांच्या सक्षमीकरणासाठी ध्यान साधना गरजेची असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी ...
चंद्रपूर : दिव्यांग बांधवात विविध कौशल्य आहेत. स्वर्क्तृत्वावर लढ्यण्याची धमक आहे. त्यांच्या सक्षमीकरणासाठी ध्यान साधना गरजेची असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या नागपूर विभागीय अध्यक्ष तसेच मी घेतली भरारी फाउंडेशनच्या संचालिका ॲड. मेघा रामगुंडे यांनी केले.
राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस प्रदेश व मी घेतली भरारी फाऊंडेशनतर्फे दिव्यांग दिनाचे औचित्य साधून ज्ञानार्चना अपंगस्नेहा संस्था येथे संगीत ध्यानसाधना कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानार्चना अपंगस्नेहा संस्थेच्या संचालिका अर्चना मानलवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा पाटील, शहर उपाध्यक्ष अश्विनी तलापल्लीवार, शहर सचिव वर्षा बोमनवाडे आदी उपस्थित होते. ॲड. रामगुंडे पुढे म्हणाल्या
दिव्यांगांना स्वाभीमानाने जगता यावे, यासाठी त्यांचे कौशल्य विकसीत करणे गरजेचे आहे. त्यानुसार रा. यु. कॉंग्रेस व मी घेतली भरारी फाऊंडेशनतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी पुणे येथील समुपदेशक सरिता चितोडकर यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. संचालन व आभार राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहर अध्यक्ष प्रज्ञा पाटील यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.