स्वयं रोजगारासाठी व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:55 AM2020-12-04T04:55:51+5:302020-12-04T04:55:51+5:30
चंद्रपूर : कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. त्यामुळे कौटुंबिक गरजा भागविणे जिकिरीचे होत आहे. अशा कठीण प्रसंगी घरातील मुलगी वा ...
चंद्रपूर : कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. त्यामुळे कौटुंबिक गरजा भागविणे जिकिरीचे होत आहे. अशा कठीण प्रसंगी घरातील मुलगी वा गृहिणींनी व्यावसायिक कौशल्य शिक्षण घेऊन घर सांभाळण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या माजी अध्यक्ष स्मिता ठाकरे यांनी केले.
रोटरी क्लबच्या वतीने युवती व मुलींसाठी ब्युटीपार्लर अभ्यासक्रमाचे निशुल्क आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला रोटरीचे अध्यक्ष महेश उचाके, सचिव मनीष बोराडे, उत्तरवार, डॉ. आसावरी देवतळे, श्रीकांत रेशीमवाले, कुंगबिहारी परमार, अर्चना उचके, मिलिंद बोडखे आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रसाद पान्हेरकर तर आभार मनीष बोराडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी पल्लवी देठे, प्रिया रामटेके, संगीता चव्हाण, पुजा पान्हेरकर, पुजा राखोंडे, देवराव कोंडेकर, खुशाल ठलाल, अशोक खाडे आदी उपस्थित होते.