नगरपालिका कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:20 AM2021-06-03T04:20:59+5:302021-06-03T04:20:59+5:30

फोटो वरोरा : आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दुकानावर कारवाई करीत असणाऱ्या कर्मचाऱ्यास न.प. अध्यक्षांनी शिवीगाळ करून अडथळा निर्माण केल्याचा आरोप ...

Non-cooperation movement of municipal employees | नगरपालिका कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन

नगरपालिका कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन

Next

फोटो

वरोरा : आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत दुकानावर कारवाई करीत असणाऱ्या कर्मचाऱ्यास न.प. अध्यक्षांनी शिवीगाळ करून अडथळा निर्माण केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. न.प. अध्यक्षावर कारवाई करावी, या प्रमुख मागणीकरिता वरोरा न.प. कर्मचाऱ्यांनी बुधवारी असहकार आंदोलन केले.

१५ जूनपर्यंत लाॅकडाऊनची मुदत वाढविण्यात आली. अत्यावश्यक सेवेसह अनेक दुकाने वरोरा शहरातील १ जून रोजी सुरू होती. अत्यावश्यक सेवेचे दुकाने उघडी राहतील. अन्य दुकाने उघडता येणार नाही. परंतु ती उघडी असल्याची माहिती न.प. स्वच्छता निरीक्षक उमेश ब्राह्मणे यांना मिळाली. ते आपल्या सहकाऱ्यांसोबत पोहोचले. उघडे असलेल्या दुकानाचे फोटो काढून महसूल विभागाकडे पाठविले. महसूल विभाग व न.प. कर्मचारी दुकानावर कारवाई करत असताना न.प. अध्यक्ष अहतेश्याम अली तिथे पोहोचले. त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली, अशी तक्रार उमेश ब्राह्मणे यांनी मुख्याधिकारीकडे केली. त्यानंतर २ जूनला महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना शाखा वरोराच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी न.प. अध्यक्षांवर कारवाई करण्याची मागणी केली व बुधवारी दिवसभर असहकार आंदोलन केले.

===Photopath===

020621\img-20210602-wa0121.jpg

===Caption===

warora n. p

Web Title: Non-cooperation movement of municipal employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.