‘त्या’ वाघाचे लोकशन नाही

By admin | Published: August 28, 2014 11:41 PM2014-08-28T23:41:30+5:302014-08-28T23:41:30+5:30

वनपरिक्षेत्र वरोरा अंतर्गत येणाऱ्या सालोरी परिसरातील जंगलात पट्टेदार वाघ फिरत असल्याचे त्याच्या पगमार्कवरुन सिद्ध झाले आहे. परंतु दुसऱ्या दिवशी या पट्टेदार वाघाचे लोकेशन न मिळाल्याने

'That' is not the location of the tiger | ‘त्या’ वाघाचे लोकशन नाही

‘त्या’ वाघाचे लोकशन नाही

Next

वन मजुरांची गस्त : वन कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका
वरोरा : वनपरिक्षेत्र वरोरा अंतर्गत येणाऱ्या सालोरी परिसरातील जंगलात पट्टेदार वाघ फिरत असल्याचे त्याच्या पगमार्कवरुन सिद्ध झाले आहे. परंतु दुसऱ्या दिवशी या पट्टेदार वाघाचे लोकेशन न मिळाल्याने वाघाची भिती परिसरात कायम आहे.
वनकर्मचारी संपावर असल्याने पट्टेदार वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनमजुरांची मदत वनविभाग घेत आहे. वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सालोरी गावाच्या परिसरातील जंगलातून नाला वाहते. या नाल्यामध्ये पट्टेदार वाघाचा मागील दोन दिवसापासून वावर असल्याचे त्याच्या पगमार्कवरुन निष्पन्न झाले आहे. दोन्ही पायातील अंतर १३६ इंच असून त्याचे वय चार ते पाच वर्ष असल्याचे मानले जात आहे. हा वाघ ताडोबा अभयारण्यातून भटकला असल्याचे सांगितले जात आहे. तो वाघ भद्रावती वनपरिक्षेत्राकडे गेला, अशी माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.
सध्या वनकर्मचारी संपावर असल्याने वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी वनमजुराची मदत घेतली जात आहे. वनमजुराची नेमणूक करुनही दुसऱ्या दिवशी वाघाचे लोकेशन मिळाले नसल्याने वाघाच्या वावरबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या या वाघाने कुणावरही हल्ला केला नाही. परंतु, तो एकटा भटकत असल्याने वाघ हल्ला करण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने परिसरातील नागरिकांनी सर्तकता बाळगणे आवश्यक झाले आहे.
वनकर्मचारी संपावर असल्याने शिकारीही सतर्क झाले आहे. त्यामुळे या भटकणाऱ्या वाघालाही भिती असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. वन कर्मचाऱ्याच्या संपामुळे व वन्यप्राण्यांना धोक्याची शक्यता आहे. वनकर्मचाऱ्याच्या जागेवर वनमजुराची नेमणूक करीत वनअधिकारी आपले कर्तव्य बजावीत असले तरी, वनमजुरांकडे आधुनिक साहित्य नाही. त्यामुळे वनात काम करतांना वनमजुरांनाही अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याचे आव्हान वनविभागापुढे आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 'That' is not the location of the tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.