शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
2
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
3
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
4
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
6
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
7
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
8
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
9
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
10
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
11
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
12
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
13
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
14
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
15
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
16
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
17
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
18
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
19
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
20
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र

‘त्या’ वाघाचे लोकशन नाही

By admin | Published: August 28, 2014 11:41 PM

वनपरिक्षेत्र वरोरा अंतर्गत येणाऱ्या सालोरी परिसरातील जंगलात पट्टेदार वाघ फिरत असल्याचे त्याच्या पगमार्कवरुन सिद्ध झाले आहे. परंतु दुसऱ्या दिवशी या पट्टेदार वाघाचे लोकेशन न मिळाल्याने

वन मजुरांची गस्त : वन कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटकावरोरा : वनपरिक्षेत्र वरोरा अंतर्गत येणाऱ्या सालोरी परिसरातील जंगलात पट्टेदार वाघ फिरत असल्याचे त्याच्या पगमार्कवरुन सिद्ध झाले आहे. परंतु दुसऱ्या दिवशी या पट्टेदार वाघाचे लोकेशन न मिळाल्याने वाघाची भिती परिसरात कायम आहे. वनकर्मचारी संपावर असल्याने पट्टेदार वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनमजुरांची मदत वनविभाग घेत आहे. वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सालोरी गावाच्या परिसरातील जंगलातून नाला वाहते. या नाल्यामध्ये पट्टेदार वाघाचा मागील दोन दिवसापासून वावर असल्याचे त्याच्या पगमार्कवरुन निष्पन्न झाले आहे. दोन्ही पायातील अंतर १३६ इंच असून त्याचे वय चार ते पाच वर्ष असल्याचे मानले जात आहे. हा वाघ ताडोबा अभयारण्यातून भटकला असल्याचे सांगितले जात आहे. तो वाघ भद्रावती वनपरिक्षेत्राकडे गेला, अशी माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. सध्या वनकर्मचारी संपावर असल्याने वाघाच्या हालचाली टिपण्यासाठी वनमजुराची मदत घेतली जात आहे. वनमजुराची नेमणूक करुनही दुसऱ्या दिवशी वाघाचे लोकेशन मिळाले नसल्याने वाघाच्या वावरबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सध्या या वाघाने कुणावरही हल्ला केला नाही. परंतु, तो एकटा भटकत असल्याने वाघ हल्ला करण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने परिसरातील नागरिकांनी सर्तकता बाळगणे आवश्यक झाले आहे. वनकर्मचारी संपावर असल्याने शिकारीही सतर्क झाले आहे. त्यामुळे या भटकणाऱ्या वाघालाही भिती असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. वन कर्मचाऱ्याच्या संपामुळे व वन्यप्राण्यांना धोक्याची शक्यता आहे. वनकर्मचाऱ्याच्या जागेवर वनमजुराची नेमणूक करीत वनअधिकारी आपले कर्तव्य बजावीत असले तरी, वनमजुरांकडे आधुनिक साहित्य नाही. त्यामुळे वनात काम करतांना वनमजुरांनाही अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याचे आव्हान वनविभागापुढे आहे. (तालुका प्रतिनिधी)