आता सोसायट्यांच्या निवडणुकींचे पडघम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:23 AM2021-01-15T04:23:47+5:302021-01-15T04:23:47+5:30

नागभीड : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम संपत नाही तोच नागभीड तालुक्यात सोसायट्यांच्या निवडणुकींचे पडघम वाजणार आहेत. तसे सूतोवाच सहकार ...

Now the drumbeat of society's elections | आता सोसायट्यांच्या निवडणुकींचे पडघम

आता सोसायट्यांच्या निवडणुकींचे पडघम

Next

नागभीड : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम संपत नाही तोच नागभीड तालुक्यात सोसायट्यांच्या निवडणुकींचे पडघम वाजणार आहेत. तसे सूतोवाच सहकार विभागाने केले आहे.

नागभीड तालुक्यात या वर्षात निवडणुकीस पात्र असलेल्या सोसायट्यांची संख्या ३३ असल्याची माहिती आहे.

वास्तविक यातील काही सोसायट्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम यापूर्वीच जाहीर करण्यात आला होता. मात्र मध्येच कोरोनाचे संकट उद्भवल्याने या निवडणुकींना स्थगिती देण्यात आली होती. आता कोरोनाचे संकट हळूहळू दूर होत आहे. म्हणून शासनाने संबंध महाराष्ट्रात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

याच पार्श्वभूमीवर गावागावात असलेल्या सेवा सहकारी, आदिवासी, विविध कार्यकारी व अन्य विविध सोसायट्याच्या कोरोनामुळे स्थगिती देण्यात आलेल्या तसेच निवडणुकीस पात्र असलेल्या सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे सूतोवाच राज्य शासनाच्या सहकार विभागाने केले आहेत. यासंबंधीचा आदेश या विभागाने १२ जानेवारी २०२१ रोजी निर्गमित केला आहे. उल्लेखनीय बाब अशी की या सोसायट्यांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार आहेत.

बॉक्स

नागभीड तालुक्यातील सोसायट्या

नागभीड तालुक्यात या वर्षभरात ३३ सोसायट्या निवडणुकीस पात्र आहेत. यात आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था बाळापूर, सेवा सह.संस्था तळोधी, माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था नागभीड, सेवा सह.संस्था कोथुळणा, शारदा मजूर सहकारी संस्था कोर्धा, राजीव गांधी गिट्टीखदान मजूर सह.संस्था नागभीड, सेवा सह.संस्था जनकापूर, आदिवासी विविध कार्यकारी संस्था गोविंदपूर, सेवा सह.संस्था पळसगाव खूर्द, गृहलक्ष्मी महिला ग्रा.बि.सह.पतसंस्था नागभीड, लक्ष्मी ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था गिरगाव, वनश्री ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था गोविंदपूर, नागभीड नागरी सह पतसंस्था नागभीड, सागर अभिनव बहुउद्देशीय सह.संस्था वलनी, अन्नपूर्णा अभिनव बहुउद्देशीय सह.संस्था वलनी,राजेश्वर पा.घोनमोडे अभिनव बहुउद्देशीय सह.संस्था वाढोणा, स्व.वासुदेवराव पाथोडे अभिनव बहुउद्देशीय सह.संस्था डोंगरगाव या संस्थांसह गिरगाव येथील दोन अभिनव सह.संस्था आणि नागभीड येथील तीन संस्थांचा समावेश आहे.याशिवाय आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था मोहाळी ( मो), वाढोणा, सावरगाव,कोजबी, कोसंबी गवळी, गिरगाव,सेवा सह.संस्था मिंडाळा,ओवाळा, प्राथमिक सेवा सह.संस्था बाम्हणी, प्राथमिक टिचर्स सोसायटी नागभीड, जवाहर राईस मील तळोधी, सतगुरू आडकुजी महाराज पतसंस्था नागभीड, कर्मवीर कर्मचारी सह.पतसंस्था नागभीड, सुप्रभात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सह.संस्था नागभीड, समृद्धी महिला ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था गिरगाव आणि प्रगती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सह.संस्था या सोसायट्यांचा समावेश आहे.

Web Title: Now the drumbeat of society's elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.