‘जय’च्या शोधात वन कर्मचारी चिचाळात
By Admin | Published: July 31, 2016 01:45 AM2016-07-31T01:45:35+5:302016-07-31T01:45:35+5:30
गत तीन महिन्यांपासून गायब असलेला उमरेड-कऱ्हांड अभयारण्यातील ‘जय’ या वाघाचा शोध घेण्यासाठी
तीन महिन्यांपासून गायब
चिंधीचक : गत तीन महिन्यांपासून गायब असलेला उमरेड-कऱ्हांड अभयारण्यातील ‘जय’ या वाघाचा शोध घेण्यासाठी वनकर्मचारी चिंधीचक जवळील चिचाळ रिठ शेत शिवारातील एक बोडीजवळचा परिसर पिंजून काढला. तेथे ‘जय’चा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
‘जय’ गायब झाल्याची माहिती समोर आली तेव्हापासून वनविभाग खडबडून जागे झाले आहे. या परिसरात धानाची रोवणी करीत असलेल्या इसमाला वाघाचे पंजे दिसले. त्यामुळे त्यांनी जवळील वनकर्मचाऱ्यांना त्याची माहिती दिली. लगेच हुमा बिटाचे वनरक्षक व मिंडाळा बिटाचे वनरक्षकांनी वनचौकीदारासह बुधवारी या परिसराचा शोध घेतला. मात्र जे पंखे इसमांना दिसले, ते ‘जय’ वाघाचे नसल्याचे वनकर्मचाऱ्यांनी सांगीतले.
सध्यातरी ‘जय’च्या शोध मोहिमेमुळे वन विभागाला चांगलाच ज्वर चढला असून वनविभाग तत्परतेने कामाला लागला आहे. मात्र ‘जय’ च्या शोध परीक्षेत वनविभागाचा ‘विजय’ होते की ‘पराजय’ याकडे वन्यप्रेमींचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)