लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असतानाच चिमूर शहराच्या हाकेवरील उमा नदीच्या तिरावर एक वाघ मंगळवारी केलेल्या गाईच्या शिकारीला फस्त करीत असताना परिसरातील नागरिकांना दिसला. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच काही उत्साही लोक वाघ पाहण्यासाठी परिसरात गेले. त्यातीलच अति उत्साही असलेले गुराखी बाबा निळकंठ गोठे (७०) हे, ‘असे वाघ लई पायले’ म्हणत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना न जुमानता वाघ असलेल्या ठिकाणी गेले. मात्र वाघाने त्या गुराख्याच्या मानेवर पंजा मारुन जखमी केले. ही घटना गुरुवारी घडलीचिमूर नगर परिषद क्षेत्रातील शहरालगतच असलेल्या प्रभाग ११ मधील उमा नदीच्या काठावरील गुलाब लोथे यांच्या शिवारात गुरुवारी सकाळी एक वाघ गायीचे मास खात होता. नागरिकांना तो दिसला. त्यामुळे वाघाला बघण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली. याबाबतची माहिती वन विभागाला होताच चिमूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांना त्या परिसरात जाण्यास वनविभागाने मनाई केली. मात्र याना न जुमानता अति उत्साही तरुण तिथे जात होते तर त्यातीलच ७० वर्षीय अतिउत्साही गुराखी निळकंठ गोठे हे ‘असे लई वाघ पायले’ म्हणत त्या वाघाजवळ गेले. अचानक झुडुपात बसलेल्या वाघाने त्या शेतकºयाच्या गालावर पंजा मारला. यात ते जखमी झाले.त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
अति उत्साहीपणा गुराख्याला नडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:42 AM
सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असतानाच चिमूर शहराच्या हाकेवरील उमा नदीच्या तिरावर एक वाघ मंगळवारी केलेल्या गाईच्या शिकारीला फस्त करीत असताना परिसरातील नागरिकांना दिसला. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच काही उत्साही लोक वाघ पाहण्यासाठी परिसरात गेले.
ठळक मुद्देवाघ पहायला गेलेला गुराखी वाघाच्या हल्ल्यात जखमी