रक्तदान करून समाजकार्यात सहभागी व्हा!
By admin | Published: June 12, 2016 12:46 AM2016-06-12T00:46:13+5:302016-06-12T00:46:13+5:30
रक्तदानाचे महान कार्य करीत असतानाच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून समाजकार्यात उर्त्स्फुत सहभागी व्हावे,
बाबासाहेब वासाडे यांचे प्रतिपादन : राष्ट्रवादी काँग्रेसचे रक्तदान शिबिर
मूल : रक्तदानाचे महान कार्य करीत असतानाच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून समाजकार्यात उर्त्स्फुत सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिक्षण महर्षी अॅड.बाबासाहेब वासाडे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवभारत विद्यालय मूल येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ते बोलत होते.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल मोगरे, कर्मवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजाबराव वानखेडे, जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष ते.क. कापगते, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्ष जयश्री चन्नुरवार, प्रा.किसन वासाडे, प्रा.सुखदेव चौथाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूल शहर अध्यक्ष ममता गोजे आदी उपस्थित होते.
अॅड. वासाडे पुढे म्हणाले, शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस देशात काम करीत असून जोपर्यंत गरीब माणसाच्या उत्पन्नात वाढ होणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नसल्याचे भाकीत त्यांनी यावेळी बोलून दाखविले.
नवभारत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष नाना महाडोळे यांनी सर्वप्रथम रक्तदान केले. यावेळी २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तगट तपासणीचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी केले. उपस्थितांचे आभार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय गजपूरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश ठाकरे, महेश कटकमवार, शामू उराडे, विनोद कामडी, विकास गेडाम, प्रदीप वाळके, सुनील कामडी यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)