कोविड सेंटरमधील रुग्ण बेडअभावी तडफडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:26 AM2021-04-12T04:26:28+5:302021-04-12T04:26:28+5:30

या प्रकारामुळे नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील समाधी वॉर्डातील एक ज्येष्ठ नागरिक शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांना ...

Patients in Kovid Center are suffering from lack of beds | कोविड सेंटरमधील रुग्ण बेडअभावी तडफडत

कोविड सेंटरमधील रुग्ण बेडअभावी तडफडत

Next

या प्रकारामुळे नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील समाधी वॉर्डातील एक ज्येष्ठ नागरिक शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आले. त्यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार तब्येत बिघडल्याने त्यांना चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले. तिथे जागा नसल्याचे सांगत त्यांना परत पुन्हा कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले. परंतु तिथेही सदर रुग्णाला परत तिथे भरती करण्यात आले नाही. प्रकृती खालावत असतानाही रविवारी सकाळपासून त्यांना कुठल्याही उपचाराविना ठेवण्यात आले. या प्रकाराचा व्हीडीओ वायरल झाल्यामुळे नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.

कोट

सदर रुग्ण कोविड सेंटरमध्ये होता. मात्र त्याचे साच्युरेशन ९५ टक्क्यापेक्षा कमी असल्याने त्याला कोविड सेंटरमध्ये ठेवता येत नाही. त्यामुळे मेडिकल कॉलेजला रेफर केले. परंतु बेड नसल्याने त्याला ॲडमीट करून घेतले नाही. याबाबत आपण तेथील डॉक्टरांशी सातत्याने बोलत होतो. मात्र बराच वेळ झाल्यानंतर रुग्णवाहिका चालक रुग्णाला परत कोविड सेंटरच्या बाहेर सोडून चालला गेला. अखेर आपण डॉक्टरांशी चर्चा करून त्याला मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमीट केले.

-डॉ. अविष्कार खंडारे, मनपा वैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर.

Web Title: Patients in Kovid Center are suffering from lack of beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.