लस घेण्यात पोलिसांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:24 AM2021-03-22T04:24:48+5:302021-03-22T04:24:48+5:30

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची प्रमुख भूमिका असते. कोरोना काळात अत्यंत जोखीम असताना पोलीस अधिकारी व ...

Police initiative in vaccination | लस घेण्यात पोलिसांचा पुढाकार

लस घेण्यात पोलिसांचा पुढाकार

Next

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची प्रमुख भूमिका असते. कोरोना काळात अत्यंत जोखीम असताना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले होते. काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्याचे आदेश होते. मार्च महिन्यात पोलिसांचे लसीकरण सुरू झाले. अनेक विभागानी लसीकरणाकडे कानाडोळा केला असला तरी पोलीस विभागांनी गांभीर्याने घेतले. जिल्ह्यात पोलीस अधिकारी व अंमलदारांची संख्या २,९१६ आहे. त्यापैकी १६४ अधिकारी २,४२२ पोलीस अंमलदार असे एकूण २,५८६ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात २२ अधिकारी १५३ अंमलदार असे एकूण १७५ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणालाही पोलिसांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

महिला पोलीसही अग्रेसर

१) कोरोना लढ्यात फ्रंट लाईन वॉरिअर म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली. काहींना तर प्राण गमावावे लागले. आता कोविड लसीकरणालाही सर्वच जण पुढाकार घेत आहेत. महिला पोलीसही यात मागे नाही. त्यामुळेच टक्केवारी वाढत आहे.

२) कोरोनाच्या लसीबाबत सुरुवातील अनेक समज-गैरसमज पसरविण्यात आले होते. पहिला टप्पा हा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी होता. त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे फ्रंट लाईन वॉरिअर असलेल्यांचे लसीकरण सुरू झाले. पोलिसांनी सर्वाधिक जबाबदारी पार पाडली.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण पोलीस अधिकारी १९५

लस घेतलेले पोलीस अधिकारी १६४

जिल्ह्यात एकूण पोलीस कर्मचारी २,७२१

लस घेतलेले पोलीस कर्मचारी २,४२२

Web Title: Police initiative in vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.