४०० मेट्रिक टन निंबोळी अर्क तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:40 PM2019-06-29T22:40:31+5:302019-06-29T22:41:07+5:30

गवर्षी खरीप हंगामात विविध किडींनी आक्रमण केल्याने सोयाबीन, कापूस व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी जहाल औषधांचा वापर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना विषबाधा झाली.

Prepare 400 metric tonnes of neem extracts | ४०० मेट्रिक टन निंबोळी अर्क तयार करणार

४०० मेट्रिक टन निंबोळी अर्क तयार करणार

Next
ठळक मुद्देकृषी विभागाची मोहीम । पिकांवरील कीडनियंत्रणासाठी जहाल औषधांऐवजी सेंद्रिय फवारणी करण्यास प्रोत्साहन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गवर्षी खरीप हंगामात विविध किडींनी आक्रमण केल्याने सोयाबीन, कापूस व कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी जहाल औषधांचा वापर केला. त्यामुळे शेतकऱ्यांना विषबाधा झाली. अशा घटना यंदाच्या हंगामात घडू नये, यासाठी विभागीय कृषी कार्यालयाने जिल्ह्याला ४०० मेट्रीक टन निंबोळी अर्क तयार करण्याचे उद्दिष्ट्य दिले. कृषी विभागाने निंबोळी गोळी तयार करण्याची मोहीम हाती घेतली. यामध्ये शेतकरी सहभागी झाले आहेत.
जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात कोरपना, राजुरा, जिवती, वरोरा, भद्रावती तालुक्यातील कापूस, सोयाबिन पिकांवर विविध कींडींचा प्रादूर्भाव झाला होता. शेतकºयांनी पीक वाचविण्यासाठी आरोग्याची काळजी न घेता जहाल औषधांचा सर्रास वापर केला. त्यामुळे शेतकºयांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम झाल्याच्या घटना घडल्या. यवतमाळ जिल्ह्यातील २२ शेतकरी विषबाधेने दगावले. जिवती व कोरपना तालुक्यातील काही शेतकºयांना जहाल औषधांची लागण झाल्याने रूग्णालयात दाखल करावे लागले होते. यंदा हा प्रकार घडू नये, याकरिता कीडनिवारणासाठी निंबोळी अर्काच्या फवारणी करण्यास शेतकºयांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय विभागीय कृषी कार्यालयाने घेतला. त्यासाठी विदर्भातील सहा जिल्ह्यांना निंबोळी अर्क तयार करण्याचे उद्दिष्ट दिले. चंद्रपूर जिल्ह्याकरिता ४०० मेट्रीक टन निबोंळी अर्क तयार करण्यात येणार आहे. विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले यांनी यासंदर्भात आदेश जारी केला. त्यानुसार कृषी विभागाने तालुकानिहाय गावामध्ये मोहीम सुरू करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, मोहीम अधिकारी शेतकºयांना निंबोळी अर्काचे महत्त्व समजावून सांगत आहेत. कीडीचे लक्षणे दिसल्यास शेतकºयांनी थेट रासायनिक औषधांची फवारणी न करता सेंद्रिय फवारणीचा पर्याय स्वीकारावा, हे समजावून सांगण्यात येत आहे. निंबोळी अर्क तयार करण्यासाठी शेतकºयांना शिवारातच प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. शेतकºयांनी संभाव धोका लक्षात घेऊ न या मोहिमेत उत्स्फुर्तपणे सहभागी दर्शविला आहे.
अशी घ्यावी दक्षता
निंबोळी अर्कापासून गोळी तयार करण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिल्या जात आहे. कीडनियंत्रणासाठी घटक कोणते, त्याचा वापर कसा करावा, पीकनिहाय संभाव्य रोग याविषयी कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना माहिती देत आहेत. गतवर्षी जागृतीअभावी रासायनिक फवारणीचा अतिरेकी वापर झाला होता. फवारणीच्या आदल्या दिवशी निंबोळी अर्कापासून द्रावण तयार करावे. परंतु हे द्रावण तयार करून साठवून ठेवू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
सेंद्रिय शेतमालास प्राधान्य
निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे केवळ कीडींचे नियंत्रण होत नाही तर सेंद्रिय शेतमाल उत्पादनाला चालना मिळते. आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारी फवारणी पिकांच्या वाढीला पोषक आहे. त्यामुळे शेतकºयांनी कीडनाशक द्रव तयार करणाºया कंपन्यांच्या भुलथापांना बळी न पडता सेंद्रीय शेतमालाला पूरक निंबोळी अर्काची फवारणी करावी, अधिकाºयांंचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले.

Web Title: Prepare 400 metric tonnes of neem extracts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.