घरकुलासाठी जप्त रेती व झिरो रॉयल्टीसाठा उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:30 AM2021-04-09T04:30:21+5:302021-04-09T04:30:21+5:30
पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पर्यावरण, उद्योग, कृषी, बरांज मोकासा येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत संबंधीत अधिकाऱ्यांचा ...
पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पर्यावरण, उद्योग, कृषी, बरांज मोकासा येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत संबंधीत अधिकाऱ्यांचा आढावा, वाहतूक समस्या, मानव विकास योजनेचा आढावा घेण्यात आला. बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, तसेच संबंधीत अधिकारी व उद्योजक दुरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी पालकमंत्री यांनी सर्व तालुक्यात कोविड टेस्टींग वाढविण्यावर भर देण्याचे व रुग्णांसाठी पुरेसे बेड व्यवस्था व औषधसाठा तयार ठेवण्याचे निर्देश दिले. प्रदूषण करणाऱ्या उद्योजकांवर तसेच कामगारांचे शोषण करणाऱ्यावर कारवाई करावी, ४५ वर्षावरील कामगारांचे लसीकरण करावे, असे निर्देष दिले. मानव विकास योजनेतून दरवर्षी यंत्रणांना दिल्या जाणाऱ्या निधीचा विनियोग त्याच कामासाठी व्यवस्थित होतो का याबाबत तपासणी करावी, बरांज मोकासा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पात गेली आहे. त्यांना तातडीने मदत द्यावी, असेही निर्देश दिले.
बॉक्स
वळण मार्गाने सोडविणार वाहतूक कोंडी
शहरातील ऐतिहासिक जटपुरा गेट येथून बाहेर निघतानाच्या दाराची उंची कमी असल्याने गेटची तोडफोड न करता त्याबाजूने वळण रस्ता काढून तेथील वाहतुकीचा प्रश्न मिटवता येईल, यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच पुरातत्त्व विभागाकडून गेटच्या दरवाज्यांची दुरूस्ती व पॉलिश करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.