कोरपना येथे रेल्वे मार्ग तयार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:32 AM2021-01-16T04:32:07+5:302021-01-16T04:32:07+5:30
शेतकरी पुन्हा संकटात सिंदेवाही : कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, धानाला योग्य भाव नाही, त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढत ...
शेतकरी पुन्हा संकटात
सिंदेवाही : कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ, धानाला योग्य भाव नाही, त्यामुळे कर्जबाजारीपणा वाढत आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतले, त्यांची फरतफेड करणे कठीण झाले आहे. परिणामी दिवसेंदिवस कर्जाचा बोझा वाढत. यावर्षी धान उत्पादनही कमी झाले असून त्यांनी पुन्हा शेतकरी संकटात सापडले आहे.
जिवती तालुक्यात विजेचा लपंडाव
जिवती : जिवती तालुक्याील पाटण परिसरात गेल्या काही दिवसापासून विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विजेअभावी नागरिकांचे हाल होत आहे. महावितरण कंपनीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दाताळा मार्गावर गस्त वाढवावी
चंद्रपूर: दाताळा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मजनुंचा सुळसुळाट असतो. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन मजनुंना समज द्यावी, अशी मागणी होत आहे. प्रेमीयुगुल निर्जनस्थळी जात असल्याने एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याशिवाय सध्या बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे ओव्हरलोड वाहतूक करीत असल्याने याचा फटका रस्त्यांना बसत आहे.