पॉझिटिव्हचा रेट वाढला, खाटांची संख्याही अर्ध्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:28 AM2021-04-04T04:28:48+5:302021-04-04T04:28:48+5:30

चंद्रपूर : कोरोना संसर्ग होण्याचा वेग वाढतच असल्याने कोविड हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर व डेडिकेड कोविड सेंटरमधील खाटांची संख्या ...

The rate of positivity increased, the number of beds also halved | पॉझिटिव्हचा रेट वाढला, खाटांची संख्याही अर्ध्यावर

पॉझिटिव्हचा रेट वाढला, खाटांची संख्याही अर्ध्यावर

googlenewsNext

चंद्रपूर : कोरोना संसर्ग होण्याचा वेग वाढतच असल्याने कोविड हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर व डेडिकेड कोविड सेंटरमधील खाटांची संख्या आठवडाभरातच अर्ध्यावर आली. कोविड रुग्णांसाठी तयार केलेल्या २२ केंद्रांतील एकूण १६४१ पैकी शुक्रवारपर्यंत ८२८ खाटा शिल्लक राहिल्या. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्हचा रेट बघता जिल्हा प्रशासनाला उपचार केंद्रांसाठी इमारती ताब्यात घ्याव्या लागणार, अशीच सध्याची स्थिती आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत रुग्णांची संख्या २८ हजार ४०७ पोहोचली. दोन हजार ४०६ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. साडेचार लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात सध्या तरी एकही तालुका किंवा शहर कोरोना हॉटस्पॉट झाला नाही; मात्र चंद्रपूर, भद्रावती व वरोरा शहराची त्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. नागपूर विभागातील अन्य जिल्ह्यांचा विचार केल्यास चंद्रपूर जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट समाधानकारक आहे. त्यामुळे बाधितांच्या मृत्युंची संख्या तुलनेने कमी आहे; परंतु मार्चपासून वेग धरलेल्या पॉझिटिव्हीटी (संसर्ग) रेटला रोखण्यात अद्याप यश आले नाही. यामध्ये नागरिकांची निष्काळजी कारणीभूत असल्याचे निरीक्षण काही डॉक्टर व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंदविले. याचाच परिणाम म्हणून आरटीपीसीआर व अ‍ॅन्टिजन चाचण्यांची संख्या वाढविल्याने दरदिवशी सुमारे दोनशे ते अडीचशे नागरिक पॉझिटिव्ह आढळत आहेत.

१६४१ पैकी ८१२ खाटा शिल्लक

कोरोना बाधितांच्या उपचारासाठी डेडिकेडेड कोविड हॉस्पिटल ८, हेल्थ केअर सेंटर ३ व कोविड केअर सेंटर ८ असे एकूण १९ केंद्र आहेत. यामध्ये १ हजार ६४१ खाटा उपलब्ध आहेत. शुक्रवारी भरती झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ८२९ पर्यंत पोहोचली. आता केवळ ८१२ खाटा शिल्लक आहेत.

खासगी हेल्थ केअर सेंटरची स्थिती

चंद्रपुरातील पाच खासगी हॉस्पिटलला हेल्थ केअर सेंटर (डीसीएचसी) म्हणून शासनाने मान्यता दिली. या सेंटरर्समध्ये २१५ खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव आहेत. शुक्रवारपर्यंत ६४ रुग्ण उपचार घेत असून, १५० खाटा शिल्लक आहेत. डॉ. गुलवाडे हॉस्पिटलमधील मंजूर सर्वाधिक ९६ खाटांपैकी सध्या ५८ शिल्लक आहेत.

वन अकादमीत फक्त ७० खाटा

वन अकादमीतील कोविड केअर सेंटरमधील ३०० पैकी ७० खाटा शिल्लक आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २४० पैकी १५६ खाटाच शिल्लक राहिल्या. ब्रह्मपुरीतील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमधील राखीव ७५ पैकी ४२ शिल्लक तर चंद्रपूर येथील पंत हॉस्पिटलच्या सर्व २० खाटा फुल्ल झाल्या. मानवटकर हॉस्पिटलमध्ये २० पैकी १० शिल्लक आहेत.

११७ रुग्ण ऑक्सिजनवर

जिल्ह्यातील १११ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. गंभीर लक्षणे असणारे २३, व्हेंटिलेटर ११ व ४० रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. संसर्गाचा वेग वाढतच असल्याने सध्या शिल्लक असलेल्या ८१२ खाटा काही दिवसातच भरण्याची शक्यता आहे.

कोविड केअर सेंटर

केंद्र एकूण खाट रुग्ण भरती शिल्लक खाट

वनअकादमी ३०० - २३०-७०

वरोरा १००- ५३ -४७

ब्रह्मपुरी १००- ३२- ६८

भद्रावती १०० - ६८ -३२

चिमूर १०० -४४- ५६

मूल ५० -२५-२५

राजुरा ५०-२७ -२३

बल्लारपूर ५०- ०६ -४४

एकूण ८५०-४८५- ३६५

Web Title: The rate of positivity increased, the number of beds also halved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.