शशिकांत गणवीर।भेजगाव : मूल येथील एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कार्यालया अंतर्गत मूल तालुक्यातील नऊ गावांकरिता अंगणवाडी सेविका व मदतनिस पदभरती राबवण्यात आली. त्यासाठीची निवड यादी प्रकाशित करण्यात आली. मात्र ऐन वेळेवर प्रशासकीय कारण पुढे करुन अंगणवाडी पदभरती रद्द करण्यात आल्याची नोटिस कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावल्याने निवड झालेल्या उमेदवारात कमालीची नाराजी असून रोष व्यक्त केल्या जात आहे.एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातंर्गत मूल तालुक्यातील येसगाव, उथळपेठ, खालवसपेठ, मंदातुकुम, कोरंबी, चिखली, उश्राळा, डोंगरगाव, बेंबाळ आदी गावात अंगणवाडी सेविका व मदतनिस या पदाकरिता ११ फेब्रुवारीला जाहिरनामा ग्रामपंचायत स्तरावर लावण्यात आला. समितीद्वारे गुण पडताळणी करुन तशी निवड यादी २७ फेब्रुवारीला लावण्यात आली. व अंतिम निवड यादी १३ मार्चला लागणार होती. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्याने आचारसंहिता संपेपर्यंत पदभरती प्रक्रिया स्थगित करुन पुढील प्रक्रिया आचारसंहिता संपल्यानंतर राबविण्यात येणार असा जाहिरनामा १३ मार्चला लावण्यात आला.आचारसंहिता संपूनही एक ते दोन महिने लोटल्यानंतरही निवड प्रक्रिया सुरु झाली नाही. त्यामुळे उमेदवारांनी अनेकदा कार्यालयात जाऊन विचारणा केली. तेव्हा पुढील प्रक्रियेला उशीर असल्याचे सांगण्यात आले. व एनवेळेवर कोणतेही ठोस कारण नसताना व गावातील उमेदवारांची कोणती तक्रारी नसताना १३ जुनला पदभरती रद्द झाली असून नव्याने पदभरती घेण्यात येईल असा जाहिरनामा कार्यालयात लावण्यात आला. त्यामुळे उमेदरांमध्ये रोष व्यक्त होत आहे.जिल्हातील सर्वच तालुक्यात पदभरती पूर्ण झाली असुन नियुक्ती पत्र देऊन उमेदवार रुजूही झाले आहेत. मात्र कोणताही शासन निर्णय नसताना मूल येथील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्याच मनमर्जीने पदभरती रद्द केल्याने उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करुन पदभरती पूर्ववत करावी, अशी मागणी मुख्य कार्यपालन अधिकाºयाला मालता वाढई, धम्मदीपा वाळके, सावित्री चिचघरे, सपना वाडगुरे, अस्मिता वाळके, अश्विनी कडस्कर, भाग्यश्री कोरडे, लता आत्राम, संघा उराडे, चेतना निलमवार आदिंनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.भरती प्रक्रिया घेणाºयाला पदभरती रद्द करण्याचा अधिकार आहे. कागदपत्र घेताना उमेदवारांना पोच पावती दिली नाही. त्यामुळे काही उमेदवारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे पदभरती रद्द करण्यात आल्याची माहिती मूल येथील बालविकास प्रकल्प अधिकारी शिवगंगा पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.
मूल तालुक्यातील अंगणवाडी पदभरती ऐनवेळी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:37 PM
मूल येथील एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प कार्यालया अंतर्गत मूल तालुक्यातील नऊ गावांकरिता अंगणवाडी सेविका व मदतनिस पदभरती राबवण्यात आली. त्यासाठीची निवड यादी प्रकाशित करण्यात आली. मात्र ऐन वेळेवर प्रशासकीय कारण पुढे करुन अंगणवाडी पदभरती रद्द करण्यात आल्याची नोटिस कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावल्याने निवड झालेल्या उमेदवारात कमालीची नाराजी असून रोष व्यक्त केल्या जात आहे.
ठळक मुद्देउमेदवारांमध्ये रोष ; चौकशी करून नियुक्तीपत्र देण्याची मागणीसंडे स्पेशल...