शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:21 PM2018-09-17T22:21:43+5:302018-09-17T22:22:38+5:30

सुरूवातीला पहाडावर दमदार पाऊस झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक होती. मात्र तब्बल महिनाभरापासून निसर्गाच्या पावसाने पाठ फिरवल्याने डोलदार दिसनारी पिके करपत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पुन्हा चुराडाच होत असल्याचे दिसत आहे.

Reopen the dreams of farmers | शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा

शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा

Next
ठळक मुद्देपहाडावरील शेतकरी संकटात : हजारो हेक्टरवरील कापूस पिके धोक्यात

शंकर चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : सुरूवातीला पहाडावर दमदार पाऊस झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक होती. मात्र तब्बल महिनाभरापासून निसर्गाच्या पावसाने पाठ फिरवल्याने डोलदार दिसनारी पिके करपत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा पुन्हा चुराडाच होत असल्याचे दिसत आहे.
परिसरातील सेवादासनगर, दमपुरमोहदा, रोडगुडा, देवलागुडा, मुकादमगुडा, परमडोली, महाराजगुडा, लोलडोह, पाटागुडा आदी गावातील शेतकºयांच्या शेतात अशीच परिस्थिती आहे. याच नव्हे तर पहाडावरील प्रत्येक गावात पिके करपली जात असल्याचे चित्र असून कोरडवाहू शेतकºयांवर संकटच कोसळले आहे.
अतिदुर्गम समजल्या जाणाºया तालुक्यातील शेतकºयांचा मुख्य व्यवसाय शेती असून कोरडवाहू शेतीत कापूस ,ज्वारी, तूर ,सोयाबीन ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. सुरूवातीच्या समाधानकारक पावसामुळे शेतकºयांच्या शेतातील पिके डौलदार दिसत होती. यावर्षी तरी चांगले पीक येईल व उत्पादनात वाढ होईल, अशी आशा शेतकºयांना होती. मात्र अल्पावधीतच त्यांच्या आशा पावसामुळे मावळल्या आहेत. पेरणीनंतरच्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. त्यात नाल्यालगत असलेल्या अनेक शेतकºयांच्या शेतातील पिके वाहून गेली तर अनेकांच्या शेतातील पिके पिवळी पडले होती. अशी स्थिती असतानाही पहाडावरील शेतकऱ्यांनी हार मानली नाही. आहे ती पिके जगविण्यासाठी महागडी कीटकनाशके खरेदी करून फवारणी केली जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणात खतही टाकले आहेत. गेल्या महिनाभरापासून परतीच्या पावसाने उघाड दिल्याने आणि कडाक्याच्या उन्हामुळे आहे ते पिकेही करपून गेली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
पिके जगविण्यासाठी धडपड
ज्या शेतकऱ्यांकडे शेतात पाण्याची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी करपत असलेली पिके जगविण्यासाठी आॅईल इंजिन, विद्युत मोटापंपाच्या साहाय्याने पाणी देत पिके जगविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. कोरडवाहू शेतकरी मात्र आज ना उद्या पाऊस येईल, या आशेने आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

मागील काही दिवसांपासून निसर्गाच्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिके करपली आहेत. अजून काही दिवस उघाड राहिल्यास पहाडावरील शेतकºयांना जगणे कठीण होईल.
- महेश देवकते, उपसभापती पं.स.,जिवती

Web Title: Reopen the dreams of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.