जिल्हा निर्मितीसाठी तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2017 12:57 AM2017-01-08T00:57:15+5:302017-01-08T00:57:15+5:30

नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सिंदेवाही नगर असून तालुक्यातील मध्यवर्ती केंद्र आहे.

Representation to Tahsildars for district creation | जिल्हा निर्मितीसाठी तहसीलदारांना निवेदन

जिल्हा निर्मितीसाठी तहसीलदारांना निवेदन

Next

सिंदेवाही : सिंदेवाही जिल्हा निर्मितीसाठी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शासनाला निवेदन देण्यात आले.
चंद्रपूर - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सिंदेवाही नगर असून तालुक्यातील मध्यवर्ती केंद्र आहे. येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत भात संशोधन केंद्र, विभागीय कृषी संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे. भात संशोधन केंद्राकडे २५० हेक्टर शेतजमीन याशिवाय ५० हेक्टरमध्ये वरिष्ठ संशोधन संचालक, कृषी तज्ज्ञ व कर्मचारी यांचे निवासस्थान उपलब्ध आहे. याशिवाय शेतकरी निवास व सभागृह उपलब्ध आहे. त्यामुळे सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ स्थापन करावे तसेच सिंदेवाही जिल्हा निर्मिती करावी या मागणीचे एक लेखी निवेदन महाराष्ट्र जेष्ठ नागरिक संघातर्फे सिंदेवाही तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पी.ए. सलामे व नायब तहसीलदार उके यांना सादर करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष अशोक साळवे, अशोक तुम्मे, सोमेश्वर पाकवार, प्रा. देवराव बोरकर, रत्नाकर बांगडे, दामोधर मेंढूळकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Representation to Tahsildars for district creation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.