सिंदेवाही नगराध्यक्षांच्या निवडीला पुन्हा स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 09:32 PM2019-06-30T21:32:07+5:302019-06-30T21:32:32+5:30

सतरा सदस्यीय सिंदेवाही नगरपंचायतमध्ये ११ नगरसेवकांसह स्पष्ट बहुमत भाजपकडे आहे. काँग्रेसचे सहा नगरसेवक आहे. आतापर्यंत भाजपचा नगराध्यक्ष होता. अडीच वर्षानंतर महिला (ओबीसी) साठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण निघाले. २४ जूनला निवडणूक निश्चित झाली. दरम्यान मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यामुळे या निवडणुकीला दुसऱ्यांचा स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या नगराध्यक्षासाठी सिंदेवाहीवासींयाना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Resignation of Sindhahi municipal council resigns | सिंदेवाही नगराध्यक्षांच्या निवडीला पुन्हा स्थगिती

सिंदेवाही नगराध्यक्षांच्या निवडीला पुन्हा स्थगिती

Next
ठळक मुद्देनिवडणूक आणखी लांबणीवर : नगरविकास विभागाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही: सतरा सदस्यीय सिंदेवाही नगरपंचायतमध्ये ११ नगरसेवकांसह स्पष्ट बहुमत भाजपकडे आहे. काँग्रेसचे सहा नगरसेवक आहे. आतापर्यंत भाजपचा नगराध्यक्ष होता. अडीच वर्षानंतर महिला (ओबीसी) साठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण निघाले. २४ जूनला निवडणूक निश्चित झाली. दरम्यान मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यामुळे या निवडणुकीला दुसऱ्यांचा स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे नव्या नगराध्यक्षासाठी सिंदेवाहीवासींयाना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
भाजपचे चार नगरसेवक काँग्रेसच्या गोटात दाखल झाल्यामुळे पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी स्थगितीचा खेळ खेळला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे.
भाजपचे योगेश कोकुलवार, सुरेश पेंदाम, प्रणाली जीवने आणि पुष्पा मडावी या भाजपच्या चार नगरसेवकांनी वेगळी चूल मांडली. ते काँग्रेसच्या नगरसेवकांसोबत देवदर्शनासाठी गेले.
वेगळ्या गटाला मान्यता देण्यासाठी १२ जूनला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केली. त्यामुळे नगराध्यक्षपद हातून जाईल, अशी भिती भाजपला होती. दरम्यान, भाजपच्या चार बंडखोर नगरसेवकांच्या गटाला जिल्हाधिकाºयांनी मान्यता दिली, दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी आणि नगर विकास मंत्र्याकडे निवडणुकीवर स्थगिती आणण्यासाठी पत्रव्यवहार केला. दुसरीकडे २४ जूनला नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचीनिवडणुकीची तयारी सुरु झाली. मात्र स्थगितीचा आदेश आला. २९ जूनच्या निवडणुकीलाही स्थगितीचा आदेश आला.
भाजपच्या हालचालीमुळे काँग्रेसचे स्वप्न भंगले
पहिल्यावेळी काँग्रेसकडून आशा गंडाटे आणि भाजपकडून रत्नमाला भरडकर यांनी नामांकन अर्ज दाखल केले. सर्व नगरसेवक मतदानासाठी पोहोचले. बहुमताचा आकडा जुळल्याने भाजपची सत्ता उलथवून लावू अशी आशा काँग्रेसच्या गोटात निर्माण झाली होती. परंतु भाजपने आपली सूत्र हलविली आणि अचानक निवडणूक स्थगितीचा आदेश येऊन धडकला. त्यानंतर पुन्हा २९ जूनला ही निवडणूक होणार होती. परंतु चार बंडखोर नगरसेवकांचे मन वळविण्यात भाजपला यश आले नाही. त्यामुळे पुन्हा पुढील आदेश येईपर्यंत निवडणूक स्थगिरीचा आदेश आला. त्यामुळे निवडणूक टळली आणि नव्या नगराध्यक्षाच्या प्रतीक्षेतील सिंदेवाहीवासींच्या पदरी निराशाच आली.

Web Title: Resignation of Sindhahi municipal council resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.